- लव-जिहाद चे नावाखालील वायरल व्हिडीओ शेअर न करणे बाबत चंद्रपुर पोलीसचे आदेश
चंद्रपुर :
काही दिवसापूर्वी सोशल मिडीया माध्यमावर लव जिहाद च्या नावाखाली एका युवतीचा व्हिडीओ वायरल होत असुन सदर बाबतीत चंद्रपूर जिल्हा पोलीसांनी संबंधीत युवतीचे तक्रारीवरुन संबधीत आरोपीविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन कायदेशीर कार्यवाही केलेली असुन गुन्हयाचा तपास सुरु आहे.
तरी, या द्वारे सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, नमुद लव-जिहाद च्या नावावरील वायरल होत असलेला सदर व्हिडीओ ज्यांच्या कडे आले असल्यास त्यांनी सदर व्हिडीओ तात्काळ डिलीट करावेत. सदर व्हिडीओ व्हॉटस् अँप, इंन्स्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल मिडीया माध्यामाद्वारे इतरांना शेअर करु नये व जातीय तणाव निर्माण करु नये. सदर प्रकरणी चंद्रपुर पोलीसांनी योग्य कायदेशीर कार्यवाही केलेली आहे.