*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्तरिपाई द्वारे शालेय विद्यार्थ्यांना सामग्री वितरित.*
======================
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर शहर तर्फे केंद्रीय कार्यालय “आंबेडकर भवन” मोमीनपुरा नागपूर येथे मोठ्या हर्षउल्हासात जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना शालेय सामग्री वितरित करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी कुंभे ,उद्घाटक डॉ मोरेश्वर जी नगराळे,नागपूर प्रदेश महासचिव प्रशांतजी ढेंगरे,नागपूर शहराध्यक्ष रवींद्रजी सवईतुल, नागपूर शहर कार्याध्यक्ष क्षितिज गायकवाड, नागपूर शहर उपाध्यक्ष सुरेशजी खोब्रागडे, महिला आघाडी अध्यक्ष मेघा वाघमारे हे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ते नानाजी ढेंगरे,मिलिंदजी जगदीश ,विजयजी महेशगवळी, श्रीकांत जामगडे, मीना फुंडकर , अविनाशजी अंबाडे , मनोहर गायकवाड यांच्या सत्कार देखील करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागपूर शहर महासचिव रजत महेशगवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज वासनिक नागपूर शहर सचिव यांनी मानले या कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्ञानदीप गायकवाड,अश्वजीत कुमार,आशिष मेश्राम,शुभम वनकर, अमन खरे, राहुल मेश्राम उपस्थित होते.