भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची आगार प्रमुख यांच्या कडे मागणी
नितेश केराम
कोरपना तालुक्यातील नारंडा ते गडचांदूर ही बस सेवा विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता सुरु करण्यात यावी अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय दमदार आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राजुरा आधार प्रमुख राकेश बोढे यांच्याकडे निवेदनाद्रारे केलेली आहे
नारंडा या गावातून वर्ग 5 ते वर्ग 10 करिता अनेक विध्यार्थी शालेय शिक्षणाकरिता गडचांदूरला ये जा करतात परंतु एकही बस सेवा या वेळला उपलब्ध नसल्यामळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नारंडा वरून गडचांदूरकरिता सकाळी 10 वाजता व गडचांदूर वरून नारंडा करिता सायंकाळी 5 वाजता बस सेवा सुरु करावी झाल्यास या मार्गावरील सोनुर्ली आसन खुर्द वडगाव खिर्डी इंजापूर धामणगाव इत्यादी गावातील सुद्धा विद्यार्थ्यांचा याच फायदा होईल
आपण सदर मागणीवर सकारात्मक विचार करून नारंडा ते गडचांदूर बस सेवा या शैक्षणिक वर्षातील शाळा सुरु झाल्यावर सुरु करू अशी आश्वासन राजुरा आगार प्रमुख राकेश बोढो यांनी यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने व उपस्थित पालकांना दिले