कोरपणा मध्ये अंतरराष्ट्रीय योग दिन उत्सहात संपन्न
नितेश केराम
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने आज आंतराष्ट्रीय योग दिन मोट्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला योग हि भारताने सम्पूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी सुदृढ आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे
या निमित्ताने कोरपना येतील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते युवक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगाचे विविध प्रकार सादर केले
योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर मन आणि आत्मा यांचा सततोल साधणारी जीवनशैली आहे हा संदेश यावेळी देण्यात आला नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्वास्तथ देखील उत्तम राहते यांची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली
निरोगी भारत सक्षम भारत आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले