Home Breaking News युगात्मा माजी खासदार शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

युगात्मा माजी खासदार शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

53

युगात्मा माजी खासदार शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न



नितेश केराम
राजुरा / युगात्मा माजी खासदार तथा शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटना तालुका राजुरा यांच्या वतीने राम मंदिर राजुरा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबीराला शेतकरी बांधव कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोट्या संखेने रक्तदान केले
या कार्यक्रमास माजी आमदार ऍड वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्व सांगत रक्तदान हें सर्व श्रष्ठ सामाजिक कार्य असून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले
शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या हक्कानंसाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या विचारांना अभिवादन म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमातून शेतकऱ्यांसाठी संघर्ष आणि समाजासाठी सेवा हा संदेश देण्यात आला यावेळी प्रामुख्याने उपस्थित ऍड मुरलीधर देवाळकर शेषराव बोन्डे प्रभाकर ढवस दिलीप देरकर रमेश नळे ऍड दीपक चटप दिलीप देठे दिनकर डोहे कपिल इड्डे मधुकर चिंचोलकर सुभाष रामगिरवार विलास अंदनकर अनिल बाळसराफ पांडुरंग पोटे भाऊजी कन्नाके अमोल देवालकर रामदास कोहपरे बंडू कोडापे बंडू देठे समाधान लडके दयाराम डोंगे आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here