Home Breaking News शेतकरी संघटनेला कोरपना नगरीत दुसरा मोठा धक्का सुभाष तुराणकार, सौ आशा झाडे,...

शेतकरी संघटनेला कोरपना नगरीत दुसरा मोठा धक्का सुभाष तुराणकार, सौ आशा झाडे, ईश्वर तुराणकर ,अजय झाडे ,अभिषेक तुराणकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

44

शेतकरी संघटनेला कोरपना नगरीत दुसरा मोठा धक्का
सुभाष तुराणकार, सौ आशा झाडे, ईश्वर तुराणकर ,अजय झाडे ,अभिषेक तुराणकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश



कोरपण्याच्या राजकीय चर्चा


नितेश केराम
कोरपना दि 13 ऑक्टॉबर 2026 कोरपना तालुक्याच्या राजकीय वर्तुळात महत्वाची घडामोड घडली आहे शेतकरी संघटनेत कार्यकरत असलेले नेते सुभाष तुराणकर यांनी शेतकरी संघटनेला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला कोरपना येतील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात हा पक्ष प्रवेश पार पडला शेतकरी संघटनेत कार्यकरत असलेल्या सुभाष तुराणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चाना वेग आला आहे त्यांच्या या निर्ययामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरनांची चर्चा सुरु झाली आहे
सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र येथे झालेल्या या पक्षप्रवेशामुळे कोरपना तालुक्यातील राजकीय घडामोडिंना महत्व प्राप्त झाले आहे तुराणकर यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार याकडे राजकीय कार्यक्त्याचे लक्ष लागले आहे शेतकरी संघटनेतून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या त्यांच्या निर्णयाची तालुक्यात चर्चा सुरु असून आगामी काळात या पक्षप्रवेशाचे राजकीय पडसाद कसे उमटतात हें पाहणे महत्वाचे ठरनार आहे राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त करत सुभाष तुरानकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या पक्ष प्रवेशाच्या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे ओम पवार किशोर बावणे अमोल असेकर पवन भूसेवार पुरोशतम भोंगळे सुनील बावणे उत्तम गेडाम सत्यवान धोटेकर पुंडलिक उलमाले अभय डोहे संतोश बोर्डे सुनील देरकर अरुण मडावी प्रदीप पिंपळशेडे दिनेश खडसे दिनेश इंगळे तिरुपती किनाके उमेश कोले उमेश पालीवाल अबराल अली आशिष ताजने वर्षा लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here