*लोहार समाजाच्या निवेदनाची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली दखल*

*घुग्घूस येथील लोहार(सुतार) समाजाच्या विश्वकर्मा समाज भवणासाठी मिळणार 30 लक्ष रुपयांचा निधी*
घुग्घूस येथील लोहार (सुतार) समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत घूग्घूस येथे लोहार(सुतार) समाजाचे विश्वकर्मा समाज भवन बांधण्याची मागणी केली याची दखल घेत सदर समाज भवणासाठी 30 लक्ष रुपये देण्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
यावेळी लोहार समाज संघटना घुग्घूस चे अध्यक्ष हेमराज बावणे, सचिव रवींद्र गिरडकर, कोषाध्यक्ष सागर कांबळे, उपाध्यक्ष अरविंद गाताडे, संघटक सुनील कांबळे, सदस्य मारुती निंदेकर, सुरेश गाताडे, बाळू कुचनकर,मिलींद मांडवकर, विजय बावणे, रितीक मांडवकर, संजय कांबळे, सुरेश चंदनखेडे , तुषार गिरडकर, भुषण निंदेकर, व माया मांडवकर, प्रतिभा पेटकर, लता गाताडे, आरती कांबळे, ललिता गाताडे, रसिका गिरडकर, संगीता गाताडे, संध्या कांबळे, मंगला मेश्राम, सोनाक्षी गाताडे, ज्योती निंदेकर, आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने मतदार संघात विविध ठिकाणी अभ्यासिका आणि समाज भवन बांधण्यात येत आहे. विद्यार्थांना निशुल्क अभ्यास करता यावा, आणि समाज भवणाच्या माध्यमातून समाजाला स्वताच्या हक्काचे सभागृह उपलब्ध व्हावे हा या मागचा उद्दीष्ट आहे. यातील अनेक अभ्यासिका आणि समाज भवणाचे काम अंतिम टप्यात आहेत.
दरम्याम आज लोहार समाजाच्या शिष्ट मंडळाने कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत घुग्घूस येथे लोहार(सुतार) समाजाचे विश्वकर्मा समाज भवन बांधण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीची आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने तात्काळ दखल घेण्यात आली असून सदर सभागृहासाठी 30 लक्ष रुपये देण्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मान्य केले आहे. त्यामुळे लवकरच या सभागृहासाठी सदर निधी उपलब्ध होणार असून घूग्घूस येथे समाज भवनाच्या कामाला सुरवात होणार आहे. याबदल लोहार (सुतार)समाजाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानण्यात आले आहे.