अधिकाधिक युवक,युवतीने मतदार म्हणून नाव नोदविण्यासाठी अर्ज करून लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा

53

अधिकाधिक युवक,युवतीने मतदार म्हणून नाव नोदविण्यासाठी अर्ज करून लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा

संजय पवार
उपविभागीय अधिकारी चंद्रपुर

चंद्रपुर:
आज दुपारी 4.30 वा. तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये मा. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी नवनियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री संजय पवार यांनी BLO आणि
बीएलओ पर्यवेक्षक यांची सभा घेऊन 01/07/2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR ) कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मा.तहसीलदार तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी श्री विजय पवार आणि ना. तह. श्री साळवे श्री गादेवार उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादी चे पुनरिक्षण कार्यक्रम सुरुवात झालेली असून ज्या नागरिकांना 01/07/ 2024 रोजी वयाचे 18 वर्षे पूर्ण होणार आहेत ते मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी अर्ज करू शकतात,
येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदान करण्याची संधी मिळू शकते.
ज्या मतदारांचे नाव, पत्ता, फोटो, मध्ये चुका झालेल्या असतील त्यांनी दुरुस्तीसाठी नमुना आठ चा अर्ज करू शकतात.: मतदान केंद्रावर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांनी ते पाहून त्यावर आक्षेप नोंदवावेत आणि सदर अक्षेपांचे निराकरण मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार चंद्रपूर यांच्या मार्फत केल्या जाईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here