Home Breaking News मांगरूळ ग्रा. पं. चे गरिबांना अतिक्रमणे काढण्याची नोटीस

मांगरूळ ग्रा. पं. चे गरिबांना अतिक्रमणे काढण्याची नोटीस

97

मांगरूळ ग्रा. पं. चे गरिबांना अतिक्रमणे काढण्याची नोटीस

गरीब अतिक्रमण धारकांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बॅनर खाली आमरण उपोषण

 उपोषण मंडपात सरपंच व ग्रामसेवक विरुद्ध नारेबाजी

विस्तार अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासन नंतर उपोषणाची सांगता
__________________
मारेगावं: येथून दोन किमी अंतरावर असलेल्या मांगरूळ येथील ग्रामपंचायतीने फक्त काही गरिबांना हेतुपुरस्सर निशाणा करून त्यांना त्यांच्या घरापासून बेदखल करण्यासाठी अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली आहे. ह्याचा विरोध करीत गावातील अन्यायग्रस्त गरिबांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बॅनर खाली दिनांक 11 जुलै पासून मारेगाव तहसील समोर 72 वर्षाच्या म्हातारी समवेत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती.
1972 पासून गावातील काही गरजू व्यक्तींनी गावातील पडीत जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी आपल्या राहण्यासाठी व शेती साहित्याचा कार्यासाठी वापर सुरू ठेवला आहे. गेल्या 50 वर्षात त्या ठिकाणीं गरीब शेतकर्यांचा त्या जमिनीवर ताबा असून त्यांच्या वापर करीत आहेत. अशातच एकाएकी मांगरूळ ग्रापं प्रस्तावित प्रा. आ. केंद्र ह्या जागेवर बांधायचे आहे असे सांगून त्या जागेवरील अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली. ग्राम पंचायतीच्या ह्या हेतुपुरस्सर व सूडबुद्धी ने ग्रसित मानसिकतेतून दिलेल्या ह्या नोटीस च्या विरोधात ह्या अतिक्रमण धारकांनी आंदोलनाचा एल्गार उभारून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बॅनर खाली आमरण उपोषणाला 72 वर्षाचा म्हातारी समवेत दिनांक 11 जुलै पासून मारेगाव तहसील कार्यालयासमोर सुरुवात केली होती.

आमरण उपोषणाचे दुसऱ्या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ऍड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ऍड. दिलीप परचाके ह्यांनी भेट घेऊन उपोषण कर्त्यांची व गावकऱ्यांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यासुमारास सरपंच व ग्रामसेवक उपोषण मंडपात आले. त्या वेळेस उपोषण कर्ते व गावकऱ्यांच्या ग्रामसेवक व सरपंच ह्यांचे सोबत भेदभाव करीत असल्याचा आरोप केल्याने ग्रामसेवक व सरपंच यांचे कडून अरेरावी करून उद्धट भाषेचा वापर करण्यात आला.

ह्याचा विरोध करीत उपोषण मंडपातच ग्रामसेवक व सरपंच विरोधात नारेबाजी करण्यात आली. त्याच वेळेस विस्तार अधिकारी मुनेश्वर व वाघमारे उपोषण मंडपाला भेट देण्यास आले होते. त्यांच्या समोरच ह प्रकार घडल्याने मांगरूळ गावाचे सरपंच व ग्रामसेवक ह्यांची वागणूक दिसून आली.
ह्यावेळेस आंदोलनकर्त्यांनी अतिक्रमण काढू नये अशी मागणी विस्तार अधिकारी ह्यांचे समोर मांडून प्रस्तावित प्रा. आ. केंद्र अतिक्रमण न काढता ही करता येईल अशी मागणी केली. ह्या संदर्भात चौकशी करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे लिखित आश्वासन दिल्याने आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
ह्या वेळेस उपोषणकर्ते धनंजय भोयर, नानाजी घोटेकर, बहिणाबाई चौधरी, सुरेश भोयर, वासुदेव रोडे तसेच श्रीकांत तांबेकर, रामभाऊ जिद्देवार, बंडू कोवे, प्रफुल आदे, धनराज अडवाले, शेख खलील, दत्तू कोहळे सोबत माजी सरपंच गजानन वाढई व जगदीश ठेंगणे हे सुद्धा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here