फिल्म फेअर ” गितो की बरसात “कार्यक्रम संपन्न
कांचन गडकरी यांनी गीतो की बरसातची सुरूवात केली.
नागपुर: दिनांक ३१आगष्ट २०२४ ला सायंटिफिक सभागृह नागपूर येथे गितो की बरसात हा कार्यक्रम मूद्रा इव्हेंट अँन्ड मॅनेजमेंट मनिषा काशिकर यांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला कांचन नितीन गडकरी, वंदना विनोद बरडे,श्रुती गांधी,विशाखा मंगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या चारही प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमांचे उद्घाटन केले व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
कांचन गडकरी यांनी देवींचे गाणें म्हणून गितो की बरसातची या कार्यक्रमला सुरुवात केली.व चारही महीला शक्ती यांनी कार्यक्रमाला व स्पर्धकांना शूभेच्छा दिल्या.
वंदना बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष यांनी अवयव दान नेत्र दान देह दान रक्त दान करण्याचें आवाहन केले.
- उपस्थित लोकाना त्यांचे महत्त्व समजावून सांगितले.व त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.गितो की बरसात कार्यक्रमात ज्या गाण्यांना फिल्म फेअर अवार्ड मिळालेले होते ते गाणें सादर करण्यात आले.