*ना. सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रीय लोकनायक जनशक्ती पार्टीचे समर्थन*

19

*ना. सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रीय लोकनायक जनशक्ती पार्टीचे समर्थन*

*बल्लारपूर – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना विविध पक्ष व संघटनांच्या वतीने समर्थन जाहीर करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रीय लोकनायक जनशक्ती पार्टीचा देखील समावेश आहे. या पक्षाने ना. श्री. मुनगंटीवार यांना सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे.*
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाई (आठवले) महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्याब‌द्दल राष्ट्रीय लोकनायक जनशक्ती पार्टीने अधिकृत पत्राद्वारे ना. श्री. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे. समर्थन दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ना. श्री. मुनगंटीवार यांनी आभार मानले आहेत.
गोर-गरीब, दीन-दुबळे, दिव्यांग, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता, महिला व सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी आपण मला दिली आहे. आपल्या सहकार्यामुळे विधानसभा निवडणुकीत मी भरघोस मतांनी विजयी होईल, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी कृतज्ञता पत्राद्वारे व्यक्त केली आहे. या विधानसभा निवडणुकीत विकासाचा रथ अधिक वेगाने धावावा, यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करेन, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय लोकनायक जनशक्ती पार्टीला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here