शिरपुर : पोलीस स्टेशन येथे ओमप्रकाश विनायक फुलारे वय 57 वर्ष व्यवसाय- नोकरी-उपक्षेत्रीक प्रबंधक उकणी/जुनाड वेस्टर्ण कोलफिईस लिमीटेड (WCL) रा.भालर वसाहत ता.वणी जि.यवतमाळ यांनी लेखी तक्रार दिली की,दिनाक 26/11/2024 रोजी रात्री 11/00 वा. सुमारास आमच्या WCL उकणी विद्युत आणी यांत्रीकी विभाग उकणी येथील अंदाजे 9.5 टन वजनाचे जुने भंगार अंदाजे 30000/-रुपये प्रती टन असा एकूण किंमत 2,85000/- चा माल वाहन आयचर क्र MH/40/CM/6928 किंमत अंदाजे 10,00,000/-रु च्या साहायाने कोणीतरी चोराने चोरुन नेल्याचे त्यांना समजल्याने डब्लु सि.एल.चे गार्ड व एम.एस.एफ चे गार्ड ने नमुद वाहणाचा परीसरात शोध सुरु केला असता त्यांना नमुद वाहन भालर येथे मिळाले वाहन चालक अतुल गजानन पिदुरकर रा.कोलार पिंपरी ता.वणी जि.यवतमाळ याचे कडे त्यांनी चौकशी केली असता त्यांने सांगीतले की, नमुदचा मुद्देमाल अनुप कुमार साही उप प्रबंधक यांत्रीकी विभाग उकणी यांचे सांगणे लोडरने ट्रकमध्ये लोड करुन वणी येथील दिपक चौपाटी येथील सत्तार भाई दुकानाचे बोर्ड असलेल्या दुकानाच्या समोरील रोडचे बाजुला त्यांनी उतरविलेला आहे. अशी माहीती त्यांनी दिल्याने त्यावरुन डब्लु सि.एल.चे गार्ड व एम.एस.एफ चे गार्ड यांनी तेथे जावुन नमुदचा मुद्देमाल व वाहन त्यांने ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन शिरपुर येथे जमा केले. व अनुप कुमार साही उप प्रबंधक यांत्रीकी विभाग उकणी तसेच वाहन चालक अतुल गजानन पिदुरकर रा. कोलार पिंपरी ता.वणी जि.यवतमाळ यांचे विरुद्ध चोरीची रितसर तक्रार दिल्याने नमुद दोघांन विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कार्यवाही शिरपुर पोलीस कडुन सुरु आहे.