देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीयांना यावेळी मागणी: सामाजिक कार्यकर्ते सिद्दीकींनी निवेदनातून मागणी केली,

53

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीयांना यावेळी मागणी:

Jiसामाजिक कार्यकर्ते सिद्दीकींनी निवेदनातून मागणी केली,


घुग्घुस :- चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुस तालुक्यातील अति प्रदुषित विश्वविख्यात घुग्घुस वासियांचा जीव वाचविण्याकरीता दिनांक 9 जून 2014 रोजी ला मंजूर तिस खाटाचे ग्रामीण रुग्णालयाचे कार्य ९८% टक्के पूर्ण झाले असुन उर्वरीत राहीलेले काम तात्काळ पूर्ण करुन लोकांना चांगल्या प्रतीचा स्वास्थ्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण त्वरीत करण्यात यावे,

चंद्रपुर तालूक्यात येणाऱ्या घुग्घुस शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजाराच्यावर असून शासनाने मंजूर केलेल्या तिस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे, मौजा घुग्घुस परिसरात लॉयड्स मेटल्स कंपनी,एसीसी अदानी सिमेंट कंपनी आणि वेकोलिच्या खाणी आहे, त्यामुळे या शहरात मोठ्या प्रमाणात कामगार आपल्या कुटुंबियासह वास्तव्यास आहेत, त्यामुळे या ठिकाणी रुग्णालयाची नितांत गरज लक्षात घेता राज्य सरकारने तिस खाटांचे ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला परवानगी दिली होती व आज पूर्णत्वास जात आहे,केवळ बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे काम न झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या सिलिंग पीओपी आणि भिंतीचे पेंटिंगचे काम पूर्णपणे झालेले नाही, त्यामुळे ते काम पुर्ण करुन ग्रामीण रुग्णालयातील तिस खाटांच्या कक्षाचे काम तात्काळ पूर्ण करावे,

तसेच घुग्घुस वासीयांसाठी तिस खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे काम त्वरीत पूर्ण करुन स्वास्थ सुविधा चांगल्या प्रकारची मिळण्यासाठी तिस खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्दीकींनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीयांना यावेळी निवेदनातून मागणी केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here