Home Breaking News दारू पिवुन वाहन चालविणाऱ्यांवर चालकांवर कारवाईचा दणका

दारू पिवुन वाहन चालविणाऱ्यांवर चालकांवर कारवाईचा दणका

73

दारू पिवुन वाहन चालविणाऱ्यांवर चालकांवर कारवाईचा दणका


वाहतुक शाखा चंद्रपुर व सर्व पोलीस स्टेशनची मोहीमेत मोठी कार्रवाई


चंद्रपुर:
दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याने सदर उत्सव साजरा करण्याकरीता अतिउत्साही तरूणमंडळी महद्य प्राशन करून दुचाकी/चारचाकी वाहने’ भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रश ड्रायव्हिग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातासारखे प्रकार घडुन जिवितहानी होत असते. सदर प्रकारावर आळा घालण्याचे दृष्टीने जिल्हयात दिनांक २९ डिसेंबर २०२४ ते ३१/१२/२०२४ पर्यंत संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ठिक ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली होती.
जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपुर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणे, ट्रिपल सिट आणी बुलेटच्या सायलेन्सर याबाबत विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमे दरम्यान मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर ४०६, ट्रिपल सिट वाहन चालविणाऱ्या चालकांवर ३७४ आणी बुलेटच्या सासलेन्सर मध्ये बदल करणाऱ्या चालकांवर २४ कारवाई करण्यात आलेली आहे. तरी यापुढे कोणीही दारू पिवुन वाहन चालवु नये तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची सर्व नागरीकांनी दक्षता घ्यावी. याबाबत चंद्रपुर पीलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी आवाहन केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here