मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल
– वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौकपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा
चंद्रपुर : दि. 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौक पर्यंतचा मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद राहील. तसेच सदरचा मार्ग “नो पार्किंग झोन” व “नो हॉकर्स झोन” म्हणून घोषित करण्यात येत आहे.
सर्व वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा : या कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका- उड्डाणपूल- सिद्धार्थ हॉटेल- बस स्टॅन्ड- प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा मित्र नगर चौक- संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश करतील. तसेच सदर कालावधीत शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपुरा गेट- प्रियदर्शनी चौक- बस स्टॅन्ड चौक- सिद्धार्थ हॉटेल- उड्डाणपूल- वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक- मित्र नगर चौक मार्गे बाहेर जातील.
नागरिकांनी सदर अधिसूचनेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.