Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल

74

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल



– वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौकपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा

चंद्रपुर :
दि. 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौक पर्यंतचा मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद राहील. तसेच सदरचा मार्ग “नो पार्किंग झोन” व “नो हॉकर्स झोन” म्हणून घोषित करण्यात येत आहे.
सर्व वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा : या कालावधीत नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका- उड्डाणपूल- सिद्धार्थ हॉटेल- बस स्टॅन्ड- प्रियदर्शनी चौक मार्गे किंवा मित्र नगर चौक- संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश करतील. तसेच सदर कालावधीत शहरातून बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी जटपुरा गेट- प्रियदर्शनी चौक- बस स्टॅन्ड चौक- सिद्धार्थ हॉटेल- उड्डाणपूल- वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक- मित्र नगर चौक मार्गे बाहेर जातील.
नागरिकांनी सदर अधिसूचनेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here