सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनो दोन दिवसीय संपात सहभागी व्हा-
राज्यध्यक्ष विलासभाऊ कुमरवार महाराष्ट्र रा. ग्रा.पं. कामगार सेना एन जी पी 5825 यांनी केले आहे
नितेश केराम
कोरपना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनो येत्या दोन दिवसीय आंदोलना मध्ये सहभागी व्हा चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोरपना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी हें येत्या दोन दिवसीय म्हणजेच 1 मे ते 2 मे रोजी काम बंद आंदोलनाचा या सरकारला इशारा दिला आहे.
या आंदोलनामध्ये कोरपना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोट्या संखेने सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना 5825 चे राज्याध्यक्ष विलासभाऊ कुमरवार यांनी केले आहे .
या दोन दिवसीय संपाचे नेतृत्व विभागीय सहसचिव अनिल भोगे ,कार्यध्यक्ष मुळे साहेब, संघटण राजेश दिवटे , उपाध्यक्ष राजन लिंगाडे, कु .रेखा रेडेकर महिला आघाडी हें करणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत पंचायत कर्मचारी कामगार सेना 5825 च्या वतीने ग्रामपंचायत पंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत आहे.
यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेनेने सम्पूर्ण महाराष्ट्रात दोन दिवसीय संपाची हाक लगावली आहे 1 व 2 मे या दोन दिवसीय संपात महाराष्ट्रातील सुमारे 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी या संपात हजर होणार आहेत.
संप यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोरपना पंचायती समोर 1 व 2 मे च्या संपात सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना एन जी पी 5825 चे राज्याध्यक्ष विलासभाऊ कुमरवार यांनी केले आहे.
तसेच कार्यध्यक्ष मुळे उपाध्यक्ष राजन लिंगाडे, उपाध्यक्ष श्रीमती अश्विनी मेसराम, कोषाध्यक्ष विजय पाटील, सहसचिव अनिल भोंगे यांनी केले आहे. सर्व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी दोन दिवसीय ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संप पुकारला आहे.