महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना मार्फत मिळाला तिन कामगारांना न्याय

36
  1. महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना मार्फत मिळाला तिन कामगारांना न्याय


चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर येथील एम.एस. राज योग एन्टरटेनमेंट या आस्थापनेत स्टॅकर मशीन ऑपरेटर्स तसेच मेंटेनन्स या कंत्राटामध्ये 1) मनोज ओमप्रकाश डोंगरे 2) सतिश संबा बल्की 3)मंगेश संबा बल्की हे तिन कंत्राटी कामगार गेल्या पाच -सहा वर्षांपासून कार्यरत असून कटींग,वेल्डिंग, डॅमेज एडलर बदलून नवीन एडलर टाकने, पॅडल फिडर पॅनल बदलवने, गेअर बॉक्स चे काम करने, फिडर चे संपूर्ण काम करने तसेच तांत्रिक स्वरूपाचे सर्व कुशल स्वरूपाचे कामे करीत असून त्यांना अकुशल कामगार श्रेणीचे वेतन दिल्या जात होते तसेच त्यांना 1 एप्रिल 2024 पासून मूळ वेतनात 19 % झालेल्या पगारवाढ पासून वंचित ठेवण्यात आलेले होते . सदर प्रकरणा संदर्भात लेखी तक्रार मिळताच महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसीएटीव्ह, चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष भाई सदानंद पि.देवगडे यांनी दिनांक 05/12/2024 ला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र चंद्रपूर चे मुख्य अभियंता मा.विजय राठोड साहेब तसेच ईतर प्रशासकीय अधिकारी यांचेकडे तक्रार नोंदवली.सदर तक्रारीच्या अणुशंगाने दिनांक 18/03/2025 ला दूपारी 4:30 वाजता झेप सभागृह, प्रशासकीय ईमारत ऊर्जा भवन चंद्रपूर येथे मा.उपमुख्य अभियंता शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखालील गैर अर्जदार एम.एस राज योग एन्टरटेनमेंट यांना या तिन कंत्राटी कामगारांना सेमी स्किल ( अर्ध कुशल ) वेतन श्रेणीचे वेतन देणे तसेच 19 % मूळ वेतन पगारवाढ एरीयस अदा करण्याचे निर्देश देण्यात आले . सदर बैठकीत मा.भूषण शिंदे साहेब ( उपमुख्य अभियंता ),मा.दिलीप वंजारी साहेब( कामगार कल्याण अधिकारी ), मा.राणि कोपटे मॅडम (सहाय्यक कल्याण अधिकारी ),मा. ए.यु.उमरे साहेब (मा.उपमुख्य अभियंता) , तसेच भाई सदानंद पि .देवगडे (जिल्हा अध्यक्ष ),भाई सुभाषसिंग बावरे (केंद्रीय प्रभारी ),भाई विवेकानंद मेश्राम (शाखा अध्यक्ष) व तिन कंत्राटी कामगार प्रामुख्याने उपस्थित होते.त्या मिटिंग च्या अणुषंगाने गैरअर्जदार एम.एस राज योग यांनी एप्रिल 2025 चे वेतन निर्देशानुसार तसेच 19 % एरीयस अदा केले.त्यामुळे कामगारांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले व त्यांनी आज सायंकाळी 5:30 वाजता मेजर गेट समोर पुष्प गुच्छ देऊन भाई सदानंद पि.देवगडे, जिल्हा अध्यक्ष, भाई सुभाषसिंग बावरे केंद्रीय प्रभारी तसेच भाई दिपक बेलगे ,जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना यांचे आभार मानून हार्दिक शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमात प्रशांत भगत , जितेंद्र लाडे , मनोज ओमप्रकाश डोंगरे ,सतिश संबा बल्की, मंगेश संबा बल्की हे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here