मान्सुनच्या अनुषंगाने आपत्ति व्यवस्थापनाची पुर्वतयारी व नियोजनचा आढ़ावा बैठक

33

 

मान्सुनच्या अनुषंगाने आपत्ति व्यवस्थापनाची पुर्वतयारी व नियोजनचा आढ़ावा बैठक



चंद्रपुर : दिनांक 15 /05 /2025 रोजी सकाळी 11.00 वा. तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये येत्या मान्सूनचे अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी व नियोजन या संदर्भात तालुका प्रशासनद्वारे, उपविभागीय अधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार चंद्रपूर यांच्या विशेष उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीला सी टी पी एस चे उपमुख्य अभियंता श्री. भूषण शिंदे,नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार , सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर चे उपकार्यकारी अभियंता श्री. अमरशेट्टीवार पाटबंधारे विभाग चे उपकार्यकारी अभियंता श्री. सय्यद अमीर गटविकास अधिकारी प स चंद्रपूर श्री. गणेश चव्हाण,
पोलीस स्टेशन रामनगर व पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर चे अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद घुघुस श्री रांजणकर, महावितरण चे कनिष्ठ अभियंता कु. सोनी देवगडे, राज्य परिवहन विभागाचे अधिकारी पुरवठा निरीक्षण अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळ कृषी अधिकारी श्री खेकारे , च. श. म.न.पा.,यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या मान्सून मध्ये अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवू शकते आणि त्यामुळे जीवित हानी, पशुहानी, शेत पिकांची हानी, होऊ शकते यासंदर्भात प्रशासनाची चांगली पूर्वतयारी व नियोजन असल्यास अशा परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना केल्या जाऊ शकतो.
इराई धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन,
इराई नदीचे खोलीकरण,
शेल्टर होम्स, आरोग्य विभागाची सुसज्जता, वाहतूक सुरक्षितता, शुद्ध पिण्याचे पाणी,आपत्कालीन स्थितीत विविध विभागांनी करावयाची कार्यवाही, मदत, पुनर्वसन, पूर पंचनामे यासंदर्भात उपविभागीय अधिकारी श्री संजय पवार आणि तहसीलदार चंद्रपूर श्री विजय पवार यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here