Home Breaking News बालकुमार फन अँड लर्न उन्हाळी शिबीर समारोप कार्यक्रम संपन्न

बालकुमार फन अँड लर्न उन्हाळी शिबीर समारोप कार्यक्रम संपन्न

131

बालकुमार फन अँड लर्न उन्हाळी शिबीर समारोप कार्यक्रम संपन्न



भद्रावती, दि. ०२ : स्थानिक साईप्रकाश व बहु. कला व शिक्षण संस्था द्वारा १ मे ते ३१ मे या कालावधीत वय वर्ष ५ ते १४ करिता बालकुमार फंड अँड लर्न हा उन्हाळी सुट्टी विशेष उपक्रम सलग अठराव्या वर्षी स्थानिक हुतात्मा स्मारक उद्यानात राबवण्यात आला. यामध्ये विविध कला, खेळ, आरोग्य तपासणी, अभिनय, नृत्य, पर्यावरण, अक्षर सुधार, कथाकथन, मातीकाम, कराटे योगा, ज्ञान, स्केटिंग, क्षेत्रीय भेट यांच्यासह बरेच उपक्रम या कालावधीत राबविण्यात आले. या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाकरिता अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका आशालता सोनटक्के, प्रमुख अतिथि म्हणून पाटील कोचिंग अकादमीचे अध्यक्ष अजय पाटील, गुरुदेव संस्कार शिबिर प्रमुख व युवा कीर्तनकार गुणवंतजी कुत्तरमारे, ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश रामटेके, माजी आरोग्य सहाय्यक किशोर पांढरे, ग्रामगीताचार्य सोनाली गावंडे, नेहा कटलावार, वनिता गिरडकर तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चे सदस्य प्रवीण चिमूरकर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मुलांनी यादरम्यान तयार केलेल्या चित्रकला विविध कागद कलाकृती, माती कामाचे नमुने, बीज रोपण केलेले रोपटे, इ. च्या प्रदर्शनीचे उद्घाटन फीत कापून व संविधान आणि ग्रामगीता या ग्रंथाचे पूजन तथा दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यानंतर मुलांनी येथे शिकवलेले नृत्य, नाटक, कवी संमेलन यांचे सादरीकरण केले. यादरम्यान स्केटिंग चे वर्ल्ड रेकॉर्ड चॅम्पियन्स विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन तथा कोच राजेश येरणे यांचाही सत्कार करण्यात आला. उपक्रमातील शिकवलेल्या विषयांवर मूल्यमापन परीक्षा घेण्यात आली त्यात ‘अ’ गटातून प्रथम पोरमिता बत्तींनवार व ‘ब’ गटातून आरोही घोरपडे यांचा सत्कार तसेच यादरम्यान विविध स्पर्धा व खेळात प्रथम आलेले गार्गी रोडे, तेजस कापसे, ईशानी ठमके, श्रीयांस लाडे, विहान वासेकर, दिव्यांश्या कटलावार यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कटलावार यांचेकडून पाणी बॉटल वाटप व ड्रीम लीड फोरचुन निधी लिमिटेड कडून टिफिन बॉक्सचा तर श्रीकांत भिडिकर यांच्याकडून मुलांस भोजनदान देण्यात आले. या उपक्रमात विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांसह दैनंदिन प्रशिक्षण नेहा प्रसाद, हर्षदा हिरादेवी, स्नेहा ठमके, परिणीता नागपुरे, देवयानी रामटेके यांनी दिले. उपक्रमाकरिता सहकार्य डॉक्टर राहुल साळवे, जयश्री बत्तीनवार, सुरेंद्र हनुमंते, गोशाला जैन मंदिर भद्रावती, प्रज्ञा विकास वाचनालय नगरपरिषद भद्रावती, नामदेव रामटेके, मधुकर वाटेकर, सुभाष दिवसे, विवेक महाकाळकर आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद ठमके, सूत्रसंचालन क्षितीज शिवरकर तर आभार प्रदर्शन शालिक यांना यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here