Home Breaking News आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नाने रामाळा तलाव ठेका वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेलाच

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नाने रामाळा तलाव ठेका वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेलाच

224

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नाने रामाळा तलाव ठेका वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेलाच



 चंद्रपुर : दिनांक ०५/०६/२०२५ २० कलमी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत रामाळा तरलव ठेका मच्छीमार बांधवांना मिळवून दिल्याबद्दल किशोर जोरगेवार, आमदार चंद्रपूर विधानसभा वाल्मीकी मबहुआ सहकारी संस्था याचे सभापती बंडू हजारे व संचालक मंडळ यांकडून त्यांना पुष्पगुच्छ देवून आभार मानले.
  • चंद्रपूर शहरामध्ये अगोदर ७ तलाव होते. परंतु या तलावावर अतिक्रमण झाल्यामुळे तलाव अतिक्रमणामध्ये नाहिसे झाले. १९५७ पासून रामाळा तलावावर मासेमारी करणारे बाल्मीकी मच्हुआ सहकारी संस्थेचे सभासद आपल्या जीवाचे रान करून अनेक धनधाडण्या अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती व समूहाकइत अतिक्रमणाचे प्रयत्न झाले व होत असून या सर्व प्रसंगांना तोंड देत रामाज्य तलाव या संस्थेने आत्तापर्यंत बाबवून ठेवलेला आहे.
  • याची निगा राखत असताना संस्थेचे सभासद गेल्या १० पिढ्यापासून १२ महिने तलाव साफ करणे (ईकोरनिया वनस्पती) गणपती व देवीने सांगाडे काढणी, निर्माल्य, मूर्तीचे सांगाडे, मृत जनावरे तसेच आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे शव काढणे हे सर्व काम आरोग्याशी निगडीत असूनसुद्धा कोणताही मोबदला न घेता या संस्थेचे सभासद आत्तापर्यंत करीत आहे. परंतु या संस्थेला दर ५ वर्षांनी तलाव ठेका मुतनीकरण करताना अशाय किचकट तलाव ठेका धोरणाला सामोरे जावे लागत असतांना अनेक अडचणी येत असल्यामुळे येथील मासेमारी करणाच्या सभासदांना आपल्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येण्याची भिती निर्माण होत असते. सद्या या तलावावर २०० कुटुंब आपली उपजिवीका करीत आहे.
  • तलाव ठेका देत असताना ७ पैकी जो १ रामाळा तलाव ज्या मासेमारी समाजानी, सभासदांनी वाचवला आहे त्यांनाच विना अटी शर्तीने तलाव ठेका देण्यात यावा यासाठी मागील वर्षी तलाव ठेका संपल्याने मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करुन तसेच कोरोना काळामध्ये मासेमारी न झाल्याने तसेच सौदर्याकरण व खोलीकरणाच्या नावाखाली पाणी सोडल्याने २०१९ ते २०२३ पर्यंत संस्थेच्या सभासदांना व संस्थेला आर्थिक नुकसान झाल्याने याच मुद्दयाला धरुन तसेच मच्छीमारांनी रामाळा तलाव वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न या आधारावर दि. ०५/०६/२०२५ ला जिल्हाधिकारी यांच्याकडे चंद्रपूर विधानसभेने आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी बैठक लावून रामाळा तलाब ठेका वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेलाच देण्यात यावा अशी विनंती करुन प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले. व बैठकीत जिल्हाधिकारी यानी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना आदेश देवून लवकरात लवकर तलाव ठेका करारनामा करुन संस्थेला देण्यात यावा अशा आदेश दिल्याने संस्थेच्या सभासदामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले व संस्थेचे सभापती बंडू हजारे यांनी बैठकी दरम्यान आमदार किशोरभाऊ जोरगेवार व उपविभागीय अधिकारी तहसिलदार याचे आभार मानले. तसेच आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
  • या प्रसंगी संस्थेचे सभापती बंडू हजारे, संचालक लक्ष्मण टोकला, संचालक संतोष झा, पांडूरंग गावतुरे, शंकर बक्कलवार, देवराव मंचल्लावार, विनोद आळेकर, कांचन दाते, संगिता दडगेलवार, शंकर गुमलवार, संस्थेचे सचिव आनंद कस्तुरे यांनी आभार मानले. तसेच भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष कृष्णाजी नागपूरे, कार्याध्यक्ष योगेश दुधपचारे, रमेश नागपूरे, देवराव पिंपळकर, यांनी सुद्धा आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे आभार मानले.बंडू मेंगा हजारे सभापती वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्था, चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here