शेतीच्या वादातून मुलाकडून वडिलाची हत्या

3

शेतीच्या वादातून मुलाकडून वडिलाची हत्या

नितेश केराम
गडचांदूर शेतीच्या वादातून दारूच्या नशेत मुलाने अवजड शेस्त्रiने वार करून जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची धाकादायक घटना 23 जून रोजी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बिनबा वार्ड येते घडली ताराचंद उर्फ दारासिंग बाबुसिंग बैस वय वर्ष 62 असे मृतक वडिलाचे तर मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद उर्फ दारासिंग बैस वय वर्ष 30 असे आरोपी मुलाचे नाव आहे
सदर घटनेतील मृतक वडिलाची वरोरा येतील मोवाडा येते वडीलोपार्जित शेती आहे या शेती बावत आरोपी मुलगा नेहमी घरात वाद घालत होता घटनेच्या रात्री 9 ते 11 च्या दरम्यान आरोपी मुलगा घरी दारू पिऊन आला आणि शेतीच्या वादावरून वडिलांसोबत झगडा भांडण करू लागला दरम्यान राग अनावर झाल्याने मुलाने घरातील अवजड धारदार शत्राने वडिलांच्या तोंडावर डोक्यावर आणि शरीरातील इतर भागांवर वार करून जागीच ठार केले
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा कार्यवाही करून पुरावे गोळा केले प्रेत सामान्य रुग्णालयात रवाना करून आरोपीला घटनास्थळा वरून ताब्यात घेतले आरोपी मुलावर शहर पोलीस स्टेशनं येते अ प क्र 434 2025 कलम 103 (1) भा न्या सं अनवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here