चंद्रपूर जिल्हा हादरल त्याला जिवंत सोडणार नाही धमकी दिल्यावर दुसऱ्या दिवशी हत्या…
नितेश केराम राजुरा चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात स्वास्ती गावात भावाने भावाचा खून केल्याची घटना 15 जुलै रोजी उघडकीस आली याप्रकणी राजुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे किरकोळ वादातून हि घटना घडली अशी माहिती आहे मृतक व आरोपीला दारूचे अतीव्यसन असल्याने दोघाच्या पत्नी त्यांच्या सोबत राहत नाही असे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे 14 जुलै रोजी दोनी भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले भांडण सोडविण्यासाठी आई मालन भिवंनकर या गेल्या मात्र आरोपी दतू ने तिला ढकलून दिले मारोती कशाला घरी राहतो त्याला मारून टाकल्या शिवाय सोडणार नाही अशी धमकी दतू ने दिली होती दुसऱ्या दिवशी आई मालन हि तबेत बरी नसल्याने मुलीने त्यांना दवाखान्यात नेले होते 15 जुलै रोजी घरी कुणी नसल्याने दोघा भावात पुन्हा वाद झाला या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले लहान भाऊ दतू ने लाकडी दांड्याने मोट्या भाऊ मारोतीच्या डोक्यावर जोरदार वार केला या हल्यात मोरोती जागेवर कोसळला आणि गतप्राण झाला घरी आल्यावर बहीणीला मारोती रक्तबंबाळ अवस्थेत दिसला याबाबत राजुरा पोलिसांना माहिती दिली असता राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले मारोतीची हत्या केल्यावर दतू घटनास्थळावरून फरार झाला राजुरा पोलीस प्रकरनाचा पुढील तपास करीत आहे