Home Breaking News क्रिस्तानंद हॉस्पिटलच्या व ऍम्ब्युलन्स फेल च्या हलगर्जी पणामुळे मुस्तकिम शफी शेख यांचा...

क्रिस्तानंद हॉस्पिटलच्या व ऍम्ब्युलन्स फेल च्या हलगर्जी पणामुळे मुस्तकिम शफी शेख यांचा दुर्दैवी मृत्यू

76

क्रिस्तानंद हॉस्पिटलच्या व ऍम्ब्युलन्स फेल च्या हलगर्जी पणामुळे मुस्तकिम शफी शेख यांचा दुर्दैवी मृत्यू



नितेश केराम
मुस्तकीम शफी शेख रा नागभीड यांची प्रकृती दि 29/06/25 सुमारे 6:00 साय बिघडली होती त्यांना फिटा व झेटके येत होते त्यांना ग्रामीण रुग्णालय नागभीड नेला असता त्यांनी प्रथम उपचार केला व नंतर रेफर करायला सांगितल
आम्ही पटकन ऍम्ब्युलन्स बोलावून पेशंट ब्रह्मपुरी क्रिस्तानंद दवाखाना येथे नेले पेशंटला स्टेचर वर टाकला त्याला फिटा व झटके खूप प्रमाणात येत असल्यामुळे थोडया वेळानं डाक्टर आले आणि सांगितलं की पेशंट क्रितिकल आहे याला व्हेटीलेतर टाकाव लागेल डाक्टर बोलले त्याचा बेडचार्ज 10000 रुपये आहे तुम्ही लवकरात लवकर 10000 रुपये जमा करा आणि स्लिप आणा मी 10000 रुपये जमा केल्या नंतर 11700 ची औषध आणली नंतर त्यांनी मला पेशंटची शर्ट काढायला आत बोलावले आत गेल्यावर मी बोलो तुम्ही आतापर्यंत उपचार सुरु केला का नाही त्यांनी मला बाहेर जायला सांगितलं हि गोष्ट लगेच मी आपल्या नातेवाईकला सांगितले
डाक्टर बाहेर आले आम्ही त्यांना विचारना केली त्यांनी सांगितलं आम्ही एक ते दीड तासात तुमाला सांगतो
लगेच अर्धा तासात दुसरे डाक्टर आले आणि सांगितलं की लवकरात लवकर याला रेफर करावं लागेल मी विचारल 11700 ची औषध व 5000 जमा केले त्याचे काय त्यांनी सांगितलं तुमची औषधी परत होणार व तुमाला पेशंट व्हेटिलेटरवाल्या ऍम्ब्युलन्स ने न्यावे लागेल आमच्याकडे ही ऍम्ब्युलन्स उपलब्ध आहे तिचा चार्ज एकूण 17000 हजार रुपये आहे ते पहिले भरावे लागेल
मी 17000 हजार रुपये भरलो वाचलेली मेडिसिन वापस केली फक्त 2070 रुपये वापस केले आणि बेडचार्ज 8800 रुपये माझ्याकडून घेतले अर्ध्या तासात सुमारे मेडिसिन 9630 रुपये बेडचार्ज 8800 रुपये ऍम्ब्युलन्स 17000 रुपये एकूण टोटल 35400 रुपये घेतले आम्ही पेशंटला घेऊन वर्धा निघालो भिसी – गिरड मार्गांवर नांद या गावाजवळ जंगलात सुमारे 11:30 वाजता रात्री ऍम्ब्युलन्स फेल झाली पेशंट क्रितीकल होता सोबत दोन डाक्टर होते ते हक्काबक्का झाले इकडं तिकडे फोन करत होते सुमारे 2:00 वाजताच्या सुमारास दुसरी ऍम्ब्युलन्स आली पहिल्या ऍम्ब्युलन्स मधून दुसऱ्या ऍम्ब्युलन्स मध्ये पेशंट शिप्ट केले 4:00 वाजता पहाटे ऍम्ब्युलन्स दत्ता मेघे हॉस्पिटल पोहचची तब्बेल 3:30 तास उशीर झाल्यामुळे पेशंटला डाव्या बाजूला प्यारालीस मारला होता व प्रकृती खूपच बिघडली होती
दत्ता मेघे हॉस्पिटलला पोहचल्याबरोबर पेशंटला lcu मध्ये टाकण्यात आले आणि प्रकृती बिघडण्याचे कारण फक्त आणि फक्त ऍम्ब्युलन्स फेल होणे आहे
नंतर दत्तामेघे हॉस्पिटल मध्ये प्रकृती अधिकच खालावल्यामुळे आम्ही पेशंटला 02/07/25 ला नागपूर AlMS मध्ये हलवले नंतर तिथेपण पेशंटची खुपच बिघडली पेशंट कोमात गेला
शेवटी डाक्टरांनी सांगितले कि पेशंटबाबत काहीच सांगता येत नाही तुम्ही घरी नेऊ शकत असाल तर पेशंटला घरी नेऊ शकता त्यामुळे आम्ही पेशंटला 12/07/25 ला स्वगावी नागभीड येते परत आणले नंतर 14/07/25 ला सकाळी 7:30 वाजता पेशंटची दुर्दैवी मृत्यू झाला
जेव्हा तुम्ही 17000 रुपये ऍम्ब्युलन्सचा किराया घेरला आणि पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये पहुचविन्याची हमी दिली तर ती ऍम्ब्युलन्स रस्त्यात फेल पडली तर त्या पेशंटची प्रकृती बिघडल्यावर त्याची जिम्मेदारी कोणाची च्यारीती हॉस्पिटल फक्त नावाचा आहे या हॉस्पिटल मध्ये फक्त पैसा चालतो या हॉस्पिटल वर कारवाई झालीच पाहिजे
तरी सदर घटनेची योग्य चौकाशी करून क्रिस्तानंद हॉस्पिटल मधील डाक्टरावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here