.संपुर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा न केल्यास आंदोलन होईल तिव्र–जि.प.उमेदवार कॉम्रेड सुहास झाडे
वणी*— नागपूर येथे झालेल्या एल्गारमोर्चामुळे शासनाने 30 जुन 2026 पर्यंत संपुर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेने तुर्त आंदोलन थांबविले आहे.नागपूर येथील एल्गारमोर्चात घोंसा वागदरा जि.प.क्षेत्रातुन भाकप व मित्रपक्षाचे उमेदवार कॉ.सुहास झाडे यांचे नेत्रुत्वात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.येथील शिवाजी महाराज चौकात झालेल्या प्रदर्शनात कॉ.सुहास झाडे यांनी ईशारा दिला कि दिलेल्या तारखेपर्यंत संपुर्ण कर्जमाफी सरकारने केली नाही तर परत महाराष्ट्र राज्य किसान सभा शेतकरयांना घेऊन आंदोलन करेल.तसेच घोंसा वागदरा गटात शेतकरयांच्या हक्कासाठी व जनतेच्या न्यायासाठी लाल झेंडा सदैव संघर्ष करीत राहिल.या गटात भाकपने विजय मिळविला तर जिल्हा परिषदेतुन सर्व प्रकारच्या योजना जनतेच्या सोबतिने खेचुन आणु असे आवाहन कॉ.सुहास झाडे यांनी केले.याप्रसंगी एल्गारमोर्चास पाठींबा देण्यास निलेश झाडे,रविंद्र ढेंगळे,नितीन ढेंगळे,वसंता पानघाटे,मारोती दरेकार,अमोल वाभीटकर,प्रमोद गाढवे,दयानंद गोरे,प्रविण झाडे,ज्ञानेश्वर झाडे,गुलाब डाहुले,योगेश झाडे,गजानन बोधाने,ईश्वर मुसळे,रमेश विधाते,रूपेश झाडे यांचेसह घोंसा बोर्डा क्षेत्रातुन शेकडो शेतकरी सहभागी झाले.