Home Breaking News रुखमई कोल वाशरीकडून नियमबाह्य पाणी उपसा

रुखमई कोल वाशरीकडून नियमबाह्य पाणी उपसा

54

रुखमई कोल वाशरीकडून नियमबाह्य पाणी उपसा



प्रदूषण व आरोग्याचाही गंभीर प्रश्न


कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी


वणी : तालुक्यातील लालपु्लीया यवतमाल महामार्ग परिसरात असलेल्या रुखमई कोल वॉशरी प्रकल्पामुळे शेतकरी व ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान होत असून, नियमबाह्य पाणी उपस्यामुळे पाणीपातळीतही घट झाली आहे. या भागातील विहिरी व हातपंप कोरडे पडले
असून, प्रदुषणामुळे आरोग्य धोक्यात सापडले आहे, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, त्वरित भूजल उपसा थांबवून कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिलेल्या तक्रारीतून केली जात आहे.

वणी लालपुलीया परिसरातील वणी यवतमाल महामार्ग येथे रुखमई कोल वॉशरी असून या प्रकल्पात कोळसा धुण्यासाठी पाण्याचरा वापर केला जात आहे. मात्र, पाण्याचा उपसा नियमवाहारित्या केला जात असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

रुखमई कोल वाशरीमुळे लगेच असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे कोल वॉशरीला दिलेली ‘कन्सैट टू ऑपरेट’ प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी. भूजल सर्वेक्षण करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी. भूजल उपस तात्काळ थांबविण्यात यावा ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचे पर्यायी व्यवस्था करून द्याव व सर्व माहितीसह चौकश अहवाल ग्रामस्थांना लेख स्वरुपात देण्यात यावा, अशे मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे समाजिक कार्यकर्ता व यांच्यासह गावकऱ्यांनी दिलेल्य तक्रारीतून मांगणी करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here