Home Breaking News मांडवा व शिवापूर येथे कोंबडा जुगारावर पोलिसांची धाड

मांडवा व शिवापूर येथे कोंबडा जुगारावर पोलिसांची धाड

98

मांडवा व शिवापूर येथे कोंबडा जुगारावर पोलिसांची धाड

सात मोटारसायकेली जप्त

नितेश केराम
कोरपना पोलीस स्टेशनं हद्दीतील मांडवा व शिवापूर गावात सुरु असलेल्या कोंबडा जुगारावर रविवारी( दि 28 ) कोरपना पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली
मांडवा येथे करण्यात आलेल्या कारवाईत दोन कोंबडे दोन काती (सूरी ) व दोन व्यक्तीना ताब्यात घेण्यात आले तर शिवापूर येथे दोन कोंबडे दोन काती व तीन व्यक्तीना ताब्यात घेण्यात आले कारवाईदरम्यान कोंबडा बाजारातील काही व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाले मात्र त्यांनी आपली वाहने तेथेच सोडून पळ काढला
या कारवाईत एकूण सात मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून सुमारे 3 लाख 90 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे
ही कारवाई पोलीस निरीक्षक लता वाडीये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बळीराम पवार नामदेव पवार लक्ष्मण नूचे दिलीप नागतुरे विनोद जाधव सटवा नापले यांच्यासह कोरपना पोलिसांच्या पथकाने केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here