Home Breaking News पोलीस वार्तापत्र आभार व विविध कार्यक्रमाचे आयोजन

पोलीस वार्तापत्र आभार व विविध कार्यक्रमाचे आयोजन

33

पोलीस वार्तापत्र आभार व विविध कार्यक्रमाचे आयोजन :-

१) चंद्रपूर पोलीस दलाकडून सर्व चंद्रपूर नागरीकांना नविन वर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा

३१ डिसेंबर, २०२५ च्या नववर्ष स्वागताचे पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाकडुन वेळोवेळी विविध मोहिम राबवुन तसेच वेळोवेळी नागरीकांना आवाहन करुन दिलेल्या सुचनांना चंद्रपूर जिल्हयातील नागरीकांनी उत्तम प्रतिसाद देवुन दिलेल्या सहकार्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार न घडता ३१ डिसेंबर, २०२५ चा बंदोबस्त शांततेत पार पडला यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन समस्त चंद्रपूरकरांचा आभार व मनपुर्वक धन्यवाद…

२) दिनांक २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हयात “पोलीस वर्धापन सप्ताह”

महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी, १९६२ रोजी करण्यात आली असुन त्या दिवसापासुन २ जानेवारी हा पोलीस स्थापना / वर्धापन दिवस म्हणुन साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधुन जिल्हयात दि.२ जानेवारी ते ८ जानेवारी २०२६ पावेतो “महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह” “रेजिंग डे” चे आयोजन करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने जिल्हयातील विविध पो.स्टे. अंतर्गत समाजातील प्रत्येक घटक, नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलीस दलातील कामकाजाची माहिती व्हावी या उ‌द्देशाने पोस्टे भेटीचे आयोजन, शस्त्रास्त्र प्रदर्शनी, पोलीस बॅण्ड पथकचे प्रदर्शन, तसेच जिल्हयातील विविध शाळा/महाविद्यालय, सोसायटी व इतर ठिकाणी पोलीस काका-पोलीस दीदी मार्फत लहान बालके व महिला सुरक्षा, पोक्सो कायदा, वाहतुकीचे नियम, सायबर सुरक्षा, अमली पदार्थाचे दुष्परिणाम, अंधश्रध्दा निर्मुलन/जादु टोना, कॅरीअर मार्गदर्शन ईत्यादी जनजागृतीवर मार्गदर्शन कार्यक्रम, रैली, वॉकथान चे आयोजन करण्यात येणार आहे.

३) रस्ता सुरक्षा अभियान-२०२६ चे शुभारंभ

दिनांक १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ पावेतो जिल्हयात रस्ता सुरक्षा अभियोन राबविण्यात येत असुन त्याअनुषंगाने प्रत्येक पोस्टे स्तरावर वाहतुक नियमांची व चिन्हांची प्रदर्शनी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतुक नियमाबाबत मार्गदर्शन, ट्रॉन्सपोर्टची बैठक, वाहनांना रेडीयम रिप्लेक्टर लावणे, वाहतुक नियमावरील निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व स्पर्धा चे आयोजन, गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस, वाहन चालक व पोलीस अंमलदारांचे आरोग्य शिबीराचे आयोजन, शहरातील
मुख्य रस्त्यावर पथनाट्य सादरीकरण, अपघातात पोलीसांना मदत करणारे नागरीकांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी, नागरीकांनी आप-आपले पाल्य, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविणे बाबत प्रोत्साहन देवुन पोलीसांना सहकार्य करावे.

गुन्हा उघडकीस :-

४) पोलीस स्टेशन पडोली येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यास यश

दि.१३ डिसेंबर, २०२५ रोजी पो.स्टे. पडोली हद्दीतील साईकृपा नगरी, नायरा पेट्रोल पंप रोड दाताळा ता. जि. चंद्रपूर येथे घडलेला घरफोडीचा गुन्हा पडोली पोलीसांनी उघडकीस आणुन दोन आरोपी नामे तिरुपती अशोक दासलवार, आणि सचिन उर्फ बोंडा विलास बदखल दोन्ही रा. बल्लारपूर यांना अटक करुन त्यांच्याकडुन चोरीतील सोन्या-चांदीचे दागीने व रोख असा एकुण ४,३५,५००/- रुपयाचा माल व वाहन जप्त केला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनात सपोनि श्री योगेश हिवसे यांचे नेतृत्वात पडोली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

वाहतुक नियमन कार्यवाहीः-

2/3

५) ३१ डिसेंबर, २०२५ च्या पार्श्वभुमीवर ४ दिवसात ४८९ वाहन चालकांवर काचार

सरत्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द धडक मोहिम राबवुन दि.२८/१२/२०२५ ते ३१/१२/२०२५ पावेतो चार दिवसाच्या कालावधीत जिल्हयात तब्बल ४८९ वाहन चालकांवर “ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह” अंतर्गत कारवाई केलेली आहे.

निर्णयाचे शिक्षण :-

६) खुनाच्या गुन्हयातील आरोपीला जन्मठेपाची शिक्षा – न्याय निर्णय

पो.स्टे. रामनगर अप.क.५०५/२०२३ या गुन्हयातील आरोपीस कलम ३०२ भादंवि मध्ये आजन्म सश्रम कारावास व १०,०००/- रु. दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. कोर्ट विद्यमान श्री एल. डी. बिले, जिल्हा सत्र न्यायाधिश चंद्रपूर, सरकारी अभियोक्त श्री एस. देगावार, सहा. सरकारी वकील चंद्रपूर, पैरवी अधिकारी पोउपनि श्री शामराव पोईनकर, तपासी अधिकारी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर
[1/1, 8:54 PM] mdhanif3786: नागरिकांना आवाहन :-

७) वाहतुक नियमना बाबत

उत्सव साजरा करतांना स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात टाकू नका, मद्यप्राशन करुन वाहन चालवू नका, वाहतूक नियमांचे पालन करुन सुरक्षित प्रवास करावा. वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करावे.

८) प्रतिबंधीत नायलॉन मांजा बाबत

नायलॉन मांजाचा वापर, खरेदी विक्री करु नये आणि जो कोणी नायलॉन मांजा बाळगतांना किंवा विक्री करतांना किंवा साठवणुकदार आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील पोलीस हेल्पलाईन ११२ वर तात्काळ संपर्क करुन त्याबाबतची माहिती दयावी.

९) अमली पदार्थाचे अवैध वापरा बाबत

अमली पदार्थाचे सेवन करणे, अमली पदार्थ जवळ बाळगणे किंवा अमली पदार्थ खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे, असे करतांना कोणी आढळल्यास चंद्रपूर पोलीस दलाचे 7887890100 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती देवुन चंद्रपूर नशामुक्त करण्यास पोलीसांना सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here