Home Breaking News आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

42

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन



भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्वाची भूमिका: विवेक बोढे


घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शुक्रवार, २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नगर सेवक विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी नगर सेवक विवेक बोढे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना नगर सेवक विवेक बोढे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी २३ जानेवारी रोजी साजरी केली जाते, ज्याला पराक्रम दिवस म्हणूनही ओळखले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेते होते ज्यांनी ‘तुम मुझे खुन दो, मै तुम्हे आजादी दूंगा!’ ही घोषणा दिली या घोषणेने तरुणांना प्रेरणा दिली. स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी ‘आजाद हिंद सेनेची’ स्थापना केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्वाची भूमिका होती.

यावेळी भाजपाचे बबलू सातपुते, प्रणय काटवले, उमेश दडमल, गणेश राजूरकर, रज्जाक शेख, सुनिल बाम, वसंत भोंगळे, शंकर खैरे, प्रज्वल पेटकर, रोशन पिंपळकर, हनुमान खडसे, रेश्मा पिंपळकर, खुशबू मेश्राम,भारती पर्ते, प्रिया नागभीडकर, जाई आत्राम, मयूरी धुर्वे, नेहा कुम्मरवार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here