आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
२६ जानेवारी हा दिवस आपल्या लोकशाहीचा आत्मा: विवेक बोढे
घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे २६ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी नगर सेवक विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आली.
मनोगत व्यक्त करतांना नगर सेवक विवेक बोढे म्हणाले, भारतीय प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले. प्रजासत्ताक दिन देशाच्या लोकशाही मूल्यांची, संविधान निर्मितीची आणि राष्ट्रीय एकात्मतेची आठवण करून देतो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिवस आहे. स्वातंत्र्याची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. २६ जानेवारी हा दिवस आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना लागू झाली आणि आपला भारत देश एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक बनला.
यावेळी नगर सेवक निरीक्षण तांड्रा, आशिष मशीरकर, नगर सेविका वैशाली ढवस, मिना मोरपाका, भाजपाचे अमोल थेरे, बबलू सातपुते, गणेश कुटेमाटे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, शीतल आत्राम, उषा आगदारी, किरण जुनघरे, सुनीता पाटील, धनराज पारखी, असगर खान, कोमल ठाकरे, गणेश राजूरकर, हेमंत पाझारे, उमेश दडमल, संजय भोंगळे, हेमराज बोंमले, विवेक तिवारी, सचिन नांदे, पियुष भोंगळे, योगेश होकम, अनिल नित, निरंजन नगराळे, सिनू कोत्तूर, सुनील राम, हेमंत कुमार, सचिन कोंडावार, मुज्जू लोहाणी व मोठया संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.