घुग्घुस भाजपातर्फे ‘एक पेड माँ के नाम‘ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण
वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज -: विवेक बोढे
घुग्घुस: शहरातील प्रभाग क्रमांक ४ येथे ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तसेच ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत भाजपा घुग्घुसतर्फे नगर सेवक विवेक बोढे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना नगर सेवक विवेक बोढे म्हणाले, आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम शहरातील प्रत्येक प्रभागात राबविण्यात येत आहे, याची सुरुवात प्रभाग क्रमांक ४ पासून करण्यात आली आहे. ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरु केला आहे. हा एक राष्ट्रव्यापी वृक्षारोपण अभियान आहे. याचा उद्देश आईच्या प्रति सन्मान आणि निसर्गाच्या संरक्षणा करीता प्रोत्साहन देणे आहे. नागरिक आपल्या आईच्या सन्मानार्थ वृक्ष लावून पर्यावरणाला हिरवेगार राहण्यासाठी योगदान देऊ शकतात. घुग्घुस शहर हे हिरवेगार करण्याचे आमचे स्वप्न आहे. वृक्षाचा ऱ्हास होत असल्याने आज ग्लोबल वार्मिंगचा सामना सर्वांना करावा लागत आहे, वृक्षारोपण आणि वृक्षाचे संवर्धन ही काळाची गरज आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील नगर सेवक विवेक बोढे यांनी केले आहे.
यावेळी गटनेत्या मिना मोरपाका, स्वीकृत नगर सेवक निरीक्षण तांड्रा, नगर सेवक गणेश पिंपळकर, भाजपाचे युवानेते अमोल थेरे, बबलू सातपुते, गणेश कुटेमाटे, राजेश मोरपाका, असगर खान, कोमल ठाकरे, उमेश दडमल, हेमंत कुमार, सचिन नांदे, प्रणय काटवले, अजय लेंडे, रज्जाक शेख व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.