Home Breaking News जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे उसगाव येथे भव्य वृक्षारोपण मोहीम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे उसगाव येथे भव्य वृक्षारोपण मोहीम

40

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे उसगाव येथे भव्य वृक्षारोपण मोहीम



घुग्घुस, दि. ५ जून :

 जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन, घुग्घुस यांच्या वतीने उसगाव येथील गणेश मंदिर परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड श्री. वाय. जी. एस. प्रसाद तसेच एसीसी सिमेंट कंपनी, नकोडा यांचे युनिट हेड श्री. लोकेश श्रीमल्ली प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. मुकेश भेलावे, श्री. संजय कुमार मिश्रा, श्री. गुणाकार शर्मा, श्री.संजय रथ, श्री.डी. एन. गुप्ता, श्री. के.पी. सिंह, श्री. तरुण केशवानी, डॉ. विद्या पाल तसेच उसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. निवेदिता ठाकरे आणि उपसरपंच श्री. मंगेश आसुटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते गणेश मंदिर परिसरात विविध प्रकारची फळझाडे, सावलीची झाडे आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण यासोबतच वृक्ष संगोपनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड श्री. वाय. जी. एस. प्रसाद यांनी उद्योगाच्या विकासात सोबत पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

उसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. निवेदिता ठाकरे आणि उपसरपंच श्री. मंगेश आसुटकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचे आभार मानले. गावाच्या विकासासोबत पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी लावलेल्या वृक्षांचे योग्य संगोपन करण्याची ग्वाही दिली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले आणि कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले.

केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्ष संगोपनाचाही संकल्प

कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित मान्यवरांनी केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे नियमित संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. उसगावच्या नागरिकांनी आणि युवकांनी गणेश मंदिर परिसर हिरवागार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here