पालकांनो सतर्क व्हा…. ! वणीत “मॅकरून शाळेचा ” शिक्षकांवर विद्यार्थ्यासाठी दारोदारी फिरायची वेळ..?

86

पालकांनो सतर्क व्हा….

वणीत “मॅकरून शाळेचा ” शिक्षकांवर विद्यार्थ्यासाठी दारोदारी फिरायची वेळ..?

•’ऍडमिशन लाओ …कमिशन पाओ’ शहरात खमंग चर्चा.

•CBSE शिक्षकांच इंग्रजी शून्य, मग विद्यार्थ्यांचं काय ?

•पालकांनो.. कुठेही विचार करूनच ऍडमिशन करा, प्रलोभनाला बळी पडू नका.

वणी :- आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल होण्यासाठी पालक वाटेल तेवढा खर्च करून आपल्या मुलांना शिक्षण देत असतात परंतु भरमसाठ शुल्क वसूल करून देखील इंग्रजी माध्यमांच्या मुलांना जर दर्जाहीन शिक्षण मिळत असेल तर त्या शाळेवर विद्यार्थी मिळविण्यासाठी आपल्या शाळेतील शिक्षकांना दारोदारी फिरवून प्रवेश मिळवावा लागत असल्याची चर्चा सद्या शहरात जोर पकडत आहे. त्यामुळे पालकांसाठी सतर्क होऊन निर्णय घेण्याची वेळ आली आहे. अन्यथा आपल्या मुलांच्या भविष्यासोबत आपणच फसगत करीत तर नाही ना ? अशी वेळ निर्माण झाली आहे.

शहरातील वरोरा मार्गावरील एका टिन पत्र्याच्या शेडमध्ये सभोवताल वाईन शॉप व मांसाहारी हॉटेल दुकानांच्या जाळ्यात फसलेल्या इंग्रजी माध्यमाच्या वणी शहरातील मॅकरून शाळेला नगर परिषद व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून कोणतीही परवानगी नसताना वर्ग १ते ४ पर्यंतचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी इंग्रजी माध्यमाची मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी नामक शाळा आहे. ही शाळाशहरात चालविण्यासाठी कोणतीच शासकीय प्रशासकीय परवानगी नसताना देखील सिटी ब्रांच म्हणून शाळा संचालकांकडून शाळेतील CBSE चे धडे गिरवनाऱ्या शिक्षकांना शहरात विद्यार्थी मिळविण्यासाठी दारोदारी फिरण्याची वेळ निर्माण होत असेल तर या शाळेतील मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांना कसे व कोणते शिक्षण द्यावे याचा पूर्ण अधिकार आपल्या पालकांना असून कोणत्याही भुलथापेला कोणीही बळी न पडता आपल्या पाळण्याच्या उज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षण व CBSE च्या नियमात बसतील अश्याच शाळेचा शोध घेवून निर्णय घेण्याची वेळ निर्माण झाली आहे. अन्यथा वेळ गेल्यावर पच्छाताप करून उपयोग होणार नाही अशी चर्चा रंगत आहे.

एका विद्यार्थ्यांच्या प्रवेशामागे विशिष्ट कमिशन
CBSE शिक्षक खोटी व बनावट माहिती पसरवून शहरात घरोघरी जाऊन नर्सरी ,केजी १ ,२ आणि वर्ग १ते ४ पर्यंत विद्यार्थी शोधत आहे. यात शिक्षणाच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारणी केल्या जात असून यातील जो कोणी शिक्षक एका विद्यार्थ्यांच्या प्रवेश मिळवतो त्याला ठराविक ” कमिशन ” देत असल्याची माहिती सूत्रांकडून खमंग चर्चा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशकरिता शुल्क आकरणीतील रक्कम चक्क शिक्षकांना कमिशन म्हणून जर मिळत असेल “कमिशनखोर शिक्षकांकडून” कमिशनग्रस्त शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य हे अंधकारमय होईल व भरमसाठ पैसा खर्च करूनही विद्यार्थी मानसिकरीत्या पांगुच घडतील त्यामुळे पालकांनी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जवळ शाळा असली म्हणजे चांगले शिक्षण मिळेल याची हमी चुकीची म्हणून प्रवेशाचा नादात जाऊन विद्यार्थ्यांचे भविष्य वाऱ्यावर टांगु नका…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here