Home Breaking News विनयभंग प्रकरणावर काँग्रेस आक्रमक भाजप नगरसेवक सूरज पांडे यांचे पड रद्द करण्याची...

विनयभंग प्रकरणावर काँग्रेस आक्रमक भाजप नगरसेवक सूरज पांडे यांचे पड रद्द करण्याची मागणी

77

विनयभंग प्रकरणावर काँग्रेस आक्रमक भाजप नगरसेवक सूरज पांडे यांचे पड रद्द करण्याची मागणी



नितेश केराम
गडचांदूर कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगर परिषद भाजपचे नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध एका विवाहित महिलेच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणाची निष्पन्न व सखोल चौकाशी करून दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून केली
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित नगरसेवका विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विनयभंग घरात घुसखोरी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून हें प्रकरण अत्यन्त गँभीर स्वरूपाचे आहे या घटने मुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महीलांच्या गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे
निवेदनानुसार संबंधित नगरसेवक यापूर्वीही विविध वादग्रस्त प्रकरनांमुळे चर्चेत राहिले असून प्रकाश निमजे यांना मारहाण करणे तसेच निवडूकीदरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याचे आरोप यापूर्वीही यांच्यावर झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे
लोकप्रतिनिधी हा समाजासाठी आदर्श असावा अशी जनतेची अपेक्षा असते मात्र गँभीर स्वरूपाच्या आरोपांमुळे लोकप्रतिनिधी पदाची प्रतिष्ठा कमी होत असून पदाचा धाक दाखवून महिलांना धमकावने सभ्य नागरिकांना मारहाण करणे आणि सतेचा गैरवापर करणे अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा करू नये अशी भूमिका काँग्रेसने निवेदनातून मांडली
देशात व राज्यात महिलांवरील अत्याचार गैरवर्तन दडपशाही आणि सत्तेच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्याचे नमूद करत प्रशासनाने अशा प्रकरनांमध्ये कठोर भूमिका घ्यावी पीडीत महिलेला न्याय व आवश्यक संरकक्षण द्यावे सम्पूर्ण प्रकरनाची निष्पन्न चौकाशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी तसेच नगरसेवक पदाबाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here