नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शीतपेयाचे वितरण

33

नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शीतपेयाचे वितरण

घुग्घुस : येथील नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे रविवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी नायब तहसीलदार कार्यालयासमोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त शीतपेयाचे वितरण करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी समाज बांधवांना ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शीतपेयाचे वितरण करण्यात आले, मोठया संख्येत समाज बांधवांनी लाभ घेतला.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, संतोष नुने, अमोल थेरे, सुनील बाम, गणेश कुटेमाटे, विवेक तिवारी, सुरेंद्र भोंगळे, मानस सिंग, सुरेंद्र जोगी, पियुष भोंगळे, प्रणय बोकडे, कोमल ठाकरे, उमेश दडमल, श्रीनिवास आरेल्ली, विनोद जंजर्ला, वमशी महाकाली, विक्की सारसर, पूजा दुर्गम, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, संदीप तेलंग, शुभम वडस्कर, आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here