Home Breaking News महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांना मोठा दिलासा!

महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांना मोठा दिलासा!

56

महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांना मोठा दिलासा!



पगारवाढ व थकीत एरियर्ससाठी सर्वोच्च न्यायालयात विजय; ॲड. दीपक चटप यांचा प्रभावी युक्तिवाद


राजुरा | नितेश केराम

महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांच्या पगारवाढीसह मागील कालावधीतील थकीत वेतन फरक अर्थात एरियर्सच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला आता न्यायालयीन लढ्यामुळे महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.

रुग्णवाहिका चालकांच्या वेतनवाढीचा तसेच मागील कालावधीतील थकीत वेतन फरकाचा प्रश्न बराच काळ प्रलंबित होता. या प्रकरणात चालकांच्या न्याय्य हक्कासाठी ॲड. दीपक चटप आणि ॲड. सिद्धार्थ चपळगावकर यांनी न्यायालयीन स्तरावर प्रभावीपणे बाजू मांडली.

त्यांच्या युक्तिवादामुळे सदर प्रकरणात रुग्णवाहिका चालकांच्या बाजूने महत्त्वपूर्ण विजय मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भातील रुग्णवाहिका चालकांना पगारवाढ तसेच पात्रतेनुसार थकीत एरियर्सची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रुग्णवाहिका चालक हे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करतात. त्यांच्या मेहनतीला आणि न्याय्य हक्काला न्याय मिळवून देणारा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या विजयाबद्दल महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांकडून ॲड. दीपक चटप आणि ॲड. सिद्धार्थ चपळगावकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून चालकांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळाल्याने रुग्णवाहिका चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here