Home Breaking News न.प स्वच्छता कर्मचाऱ्यांना लाडू भरवीत काँग्रेसने साजरा केला विजयोत्सव

न.प स्वच्छता कर्मचाऱ्यांना लाडू भरवीत काँग्रेसने साजरा केला विजयोत्सव

131

न.प स्वच्छता कर्मचाऱ्यांना लाडू भरवीत काँग्रेसने साजरा केला विजयोत्सव

घुग्घुस : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातून इंडिया आघाडी तसेच काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर या प्रचंड बहुमताने निवडून आल्या या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष शहर काँग्रेसने कुठल्याही प्रकारे उद्रेक अथवा आततायीपणा न दाखवीत अत्यंत
साधेपणाने साजरा करीत नागरिकांचे मने जिंकली

घुग्घुस शहर काँग्रेसच्या वतीने शहरातील घाण साफ करून नागरिकांच्या आरोग्याची निघा राखणाऱ्या शहरातील सफाई कर्मचारी भगणींचे बुंदी लाडुने तोंड गोड करीत व लाडू डब्बे वाटप करीत साजरा केला
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,सोशल मिडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,विशाल मादर,तिरुपती महाकाली,इंटक उपाध्यक्ष अनुप भंडारी,एन.एस.यु.आय अध्यक्ष आकाश चिलका,मोसीम शेख,शेहशाह शेख,कासम शेख,बालकिशन कुलसंगे,सुनील पाटील,अरविंद चहांदे,कुमार रुद्रारप,रफिक शेख,कपील गोगला,देव भंडारी,अंकुश सपाटे,रंजित राखुडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here