Home Breaking News महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संघटनेमार्फत मिळाला 7 बेरोजगार कामगारांना...

महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संघटनेमार्फत मिळाला 7 बेरोजगार कामगारांना न्याय

59

महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संघटनेमार्फत मिळाला 7 बेरोजगार कामगारांना न्याय



: चंद्रपूर  : महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील डब्ल्यू. टि.पी.-I /II /III येथील मे.सारंग कन्स्ट्रक्शन या अस्थापनेत गेल्या 10-12 वर्षांपासून सिव्हिल मेंटेनन्स या कंत्राटामध्ये 1) भगवान सुर्यवंशी 2) मारोती सुर्यवंशी 3) दिपक निशाद 4) सुरेश पिंपळकर 5) नितेश कोसे 6)दिलीप हनुमंते 7) अजबराव सुर्यवंशी हे सिव्हिल मेंटेनन्स या कामावर कार्यरत होते.परंतु 11 मे ला कोणतीही पूर्व सुचना न देता कंत्राट संपल्याचे कारण सांगून या कामगारांना कामावरून बंद करण्यात आले. हे सात कामगार त्यांच्या घरचे एकमेव कर्ते पुरूष असून तेच कामावरून बंद असल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या परीवारावर बेरोजगारी व ऊपासमारी ची परिस्थिती निर्माण झाली.एक महीना निघून गेला तरीही नवीन कंत्राट झाले नाही.शेवट या सात कामगारांनी 4 जून 2025 ला महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसीएटीव्ह, चंद्रपूर चे विदर्भ अध्यक्ष मा. भाई सदानंद पि.देवगडे यांच्याशी संपर्क साधून आपली समस्या सांगितली . मा.भाई सदानंद देवगडे यांनी 5 जून 2025 ला या समस्ये संदर्भात महाजनको प्रशासनाकडे तक्रार नोंदवली व या तक्रारी संबंधात पाठपुरावा करून सदर नविन कंत्राटाची प्रक्रिया जलद गतीने करवून दिनांक 12 जून 2025 पासून या बेरोजगार झालेल्या सातही कामगारांना त्यांच्या पुर्ववत कामावर रुजू करवून त्यांना रोजगार व न्याय मिळवून दिला.करीता ह्या सात कामगारांनी आज मेजर गेट समोर पुष्प गुच्छ देऊन मा.भाई सदानंद पि.देवगडे, विदर्भ अध्यक्ष यांचे तसेच मा.भाई सुभाषसिंग बावरे यांचे हुद्यपुर्वक अभिनंदन केले व महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसीएटीव्ह या संघटनेशी सदैव एकनिष्ठ राहू असे वचन दिले .या सत्कार समारंभात मा.भाई विवेकानंद मेश्राम, शाखा अध्यक्ष तसेच मा.भाई सागर किन्नाके, जिल्हा उपाध्यक्ष, मा.संजय भाऊ बोबळे, प्रशांतजी भगत व ईतर कामगार बांधव उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here