*RCCPL MP BIRLA कंपणी मुकुटबन येथे आज सकाळी पाच वाजेपासून विविध मागण्यासाठी आयटकचे नेते कॉ.अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात बेमुदत कामबंद आंदोलन सुरु*
*वणी– मुकुटबन येथील कार्यरत RCCPL MP BIRLA या सिमेंट कंपनीमधिल काम करणारे कामगारांच्या समस्यांना घेऊन आज कंपणीमध्ये स्थापीत जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियन(आयटक)चे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्राचे प्रखर व लढाऊ नेत्रुत्व कॉ.अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात आज (6/11/2025) सकाळी पाच वाजेपासून कामगारांनी कामबंद आदोलन सुरु केले.कामगारांनी या आंदोलनाला 100% प्रतिसाद दिला.कंपणीला दिलेल्या अल्टिमेटममध्ये कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्यात यावे,कामाचे तास कामगार संहीतेप्रमाणे ठेवावे,वातावरण सुविधाजनक ठेवावे यासंह आदी मागण्या करण्यात आल्या.आंदोलनाचे नेत्रुत्व जननेते कॉ.अनिल हेपटसह,अनिल घाटे,मोरेश्वर कुंटलवार,दिनेश शिटलवार,पंढरी नांदेकर,प्रविण कुळेकर,अनिल मोंडे,महादेव मेश्राम,कवडु केळझरकर,रोषन चामाटे,कलीम शेख,निरज खैरकर,अक्षय पुल्लीवार आदीं करीत आहे.