काँग्रेस, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व बीएसपीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश…..
जिवती: सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी लोककल्याणकारी योजना राबवून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कामांचा झंझावात सुरू आहे. जनतेला केवळ विकास हवा आहे. ती क्षमता फक्त भाजपा सरकारमध्येच असून आता जनतेची भाजपाला पसंती असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथे काँगेस, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, बीएसपीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.
समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहे. सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही आमदार भोंगळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, गोविंद टोकरे,तुकाराम वारलवार, राजेश राठोड, प्रल्हाद मदने ,अंबादास कंचकटले, लहूकांत काकडे , चंद्रकांत घोडगे, नारायण वाघमारे, आनंद कदम, तुबीव चिकटे, भगवान गव्हाले,अजय खंडाळे, इंदिरा काकडे यांचेसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.