Home Breaking News निवडणुक निर्णय अधिकारी घुग्घुस नगरपरिषद तथा तहसिलदार चंद्रपूर यांचे कार्यालय आदेश 

निवडणुक निर्णय अधिकारी घुग्घुस नगरपरिषद तथा तहसिलदार चंद्रपूर यांचे कार्यालय आदेश 

45

निवडणुक निर्णय अधिकारी घुग्घुस नगरपरिषद तथा तहसिलदार चंद्रपूर यांचे कार्यालय आदेश 

 

घुग्घुस :  मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे पत्र क्रमांक- रानिआ/नप-२०२५/प्र.क्र.१४/का.६ दिनांक २६/११/२०२५ अन्वये नगरपरिषद / नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णया विरोधातील याचिकाबाबत कार्यवाही करण्याबाबत पुढील निर्देश प्राप्त आहेत. ज्या नगरपरिषद / नगरपंचायती मधिल ज्या जागांसाठी जिल्हा न्यायालयात अपील दाखल असुन सुनावणी प्रलंबित आहे किंवा सुनावणी झालेली आहे परंतू आदेश अप्राप्त आहेत. फक्त अशा जागांसाठी दिनांक २६/११/२०२५ रोजी चिन्ह वाटप करता आले नाही फक्त अशा जागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे कळविले आहे.
घुग्घुस नगरपरिषदेची चिन्ह वाटपाची प्रक्रीया दिनांक २६/११/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता सुरु करुन पुर्ण करण्यात आलेली आहे. घुग्घुस नगरपरिषद येथिल १) पल्लवी प्रविण सोदारी (प्रभाग क्र.५-ब) यांचे मा. जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथे अपील क्र.१/२०२५ २) गणेश गुलाब पिंपळकर (प्रभाग क्र.७-अ) यांचे मा. जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथे अपील क्र. २/२०२५ ३) निळा लक्ष्मण चिवंडे (प्रभाग क्र.९-अ) यांचे मा. जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथे अपील क्र. ३/२०२५ चे निकाल चिन्ह वाटपाची प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत अप्राप्त असल्याने घुग्घुस नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ५-ब मधिल सदस्य पदासाठी, प्रभाग क्र. ७-अ मधिल सदस्य पदासाठी व प्रभाग क्र. ९-अ मधिल सदस्य पदासाठीची निवडणूक मा. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक २६/११/२०२५ च्या आदेशान्वये पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here