Home Breaking News प्रतिबंधीत नायलॉन मांजा साठा करून विक्री करणारे विरुध्द कारवाई

प्रतिबंधीत नायलॉन मांजा साठा करून विक्री करणारे विरुध्द कारवाई

47

प्रतिबंधीत नायलॉन मांजा साठा करून विक्री करणारे विरुध्द कारवाई

दोन वेगवेगळ्या कारवाईत नायलॉन मांजा चे २७ नग प्लॉस्टीक चक्री बंडल

किंमत एकुण २४,०००/- रु. चा माल जप्त

पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर ची कामगिरी

चंद्रपुर : दिनांक १२ डिसेंबर, २०२५ रोजी चंद्रपूर शहर पोलीसांना बातमीदारांकडुन गोपनिय माहिती मिळाली की, पो.स्टे. चंद्रपूर शहर हद्दीत बाबुपेठ वार्ड आणि अंचलेश्वर वार्ड येथील दुकानात प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री सुरु आहे. अशा खात्रीशिर माहितीवरुन पोस्टे चंद्रपूर शहर येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बाबुपेठ वार्ड चंद्रपूर येथील राधाकृष्ण चौक येथे राहणारे राजेंद्र उर्फ राजु मधुकर धकाते वय ५० वर्ष या पानठेला दुकानात पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे दुकानात पतंग उडविण्याकरीता वापरण्यात येणारा, मानवी जिवितास आणि पर्यावरणास धोकादायक असलेला प्रतिबंधीत नायलॉन मांजा असलेल्या १२ नग प्लास्टीक चक्री (Hero Plus) प्रत्येकी १०००/- रु. प्रमाणे किं. अं. १२,०००/- रु.चा माल अवैधरित्या विक्री करीता साठा करून ठेवला असल्याचे मिळुन आला.

तसेच अंचलेश्वर वार्ड ताडबन येथे अजय सदाशिव कामतवार वय ३८ वर्ष या किराणा दुकानात सुध्दा नमुद प्रतिबंधीत नायलॉन मांजा असलेल्या १२ नग प्लास्टीक चक्री (Kobra Gold) प्रत्येकी ८००/- रु. प्रमाणे किं.अं.१२,०००/- रु.चा माल अवैधरित्या विक्री ठेवला असल्याचे मिळुन आल्याने दोन्ही कारवाईत एकुण २४,०००/- रु. किंमतीचा २७ नग नायलॉन मांजा चक्री जप्त करुन पोस्टे चंद्रपूर शहर येथे कलम २२३ भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोरटे चंद्रपूर शहर चे पो.नि. श्री निशिकांत रामटेके यांचे नेतृत्वात सपोनि श्री राजेंद्र सोनवणे, पोउपनि श्री विलास निकोडे, पोहवा सचिन बोरकर, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद‌की, कपुरचंद खैरवार, भावना रामटेके, पोअं. रुपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, दिपीका झिंगरे सर्व पो.स्टे. चंद्रपूर शहर यांनी केली आहे.

नागरीकांना आवाहन करण्यात येते की, जो कोणी धाउक/किरकोळ व्यापारी नायलॉन मांजा बाळगतांना किंवा विक्री करतांना किंवा साठवणुकदार आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील पोलीस हेल्पलाईन ११२ वर तात्काळ संपर्क करुन त्याबाबतची माहिती दयावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here