Breaking Newsक्राईमचंद्रपूर इंदिरानगर परिसरातील प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा विक्री करणा-या दुकानदारांवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरची कारवाई By khabron ka safar - December 12, 2025 38 Share FacebookWhatsAppX इंदिरानगर परिसरातील प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा विक्री करणा-या दुकानदारांवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरची कारवाई चंद्रपुर : दिनांक १२/१२/२०२५ रोजी उपविभाग, पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुरचे पोलीस पथक सोबत मा. पोलीस अधिक्षक सााहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच नॉयलॉन मांजा विक्री करणा-यावर कारवाई करणे कामी रवाना होवुन पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली कि १) मनिष सुरेश राउत, वय-४७ वर्ष, धंदा-मजुरी, जात-कुणबी, रा. बॉम्ब प्लॉट, राजीव गांधीनगर, ता.जि. चंद्रपुर याचेकडुन २४ नग विविध रंगाच्या प्लास्टिक चक्रीवर गुडांळलेला प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा किमंत २४,०००/- रू. २) एकनाथ केशव चवरे, वय-५२ वर्ष, धंदा-मजुरी, जात-महार, रा. बॉम्ब प्लॉट, इंदिरानगर, , ता.जि. चंद्रपुर याचेकडुन २६ नग विविध रंगाच्या प्लास्टिक चक्रीवर गुडांळलेला प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा किमंत २६,०००/- रू. असा एकुण ५०,०००/- रूपयाचा माल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन, रामनगर येथे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद केला. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा /इम्रान खान, पोअ/किशोर वाकाटे, पोशि/शशांक बदामवार, पोशि/हिरालाल गुप्ता, मपोहवा/छाया निकोडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.