Home Breaking News बेलोरा हनुमान देवस्थानाजवळ पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ

बेलोरा हनुमान देवस्थानाजवळ पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ

29

बेलोरा हनुमान देवस्थानाजवळ पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ

वणी : – वणी तालुक्यातील बेलोरा फाटा घुग्घुस येथील पाच किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध हनुमान देवस्थानाजवळ एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

सदर वाघाचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तसेच चंद्रपूर आणि मोठा पांढरकवडा वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

वनविभागाकडून घटनास्थळी पंचनामा सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील तपास करण्यात येत आहे. नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here