Home Breaking News ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथील हरविलेल्या एकुण १८ मोबाईल चा शोध

ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथील हरविलेल्या एकुण १८ मोबाईल चा शोध

47

ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथील हरविलेल्या एकुण १८ मोबाईल चा शोध

ब्रम्हापुरी हद्दीत हरविलेल्या मोबाईलचा शोध CEIR Portal द्वारे ट्रेस करुन सदर १८ नग मिळुन आलेले मोबाईल मुळ धारकांना परत करण्यात आले आहे.

सदर ची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे-अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बानबले यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि श्री मनोज खडसे, पोहवा मुकेश गजबे, पोअं निलेश तुमसरे, स्वप्निल पळसपगार, प्रविण भिवगडे, इरशाद खान, वशिष्ठ रंगारी यांनी केली आहे.

नागरीकांसाठी सूचना.’

1- जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी.

2- जे सिमकार्ड चालू आहे ते ब्लॉक करावे व त्याच नंबरचे दुसरे सिमकार्ड सुरु करुन घ्यावे व तेच सिमकार्ड CEIR वर रजिस्ट्रेशन करीता वापरावे.

3- https://www.ceir.gov.in या वेबसाईटवर जावे.

4- Block Stolen Lost Mobile यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी.

5- ही कागदपत्रे सोबत जोडावी :- (सॉफ्टकॉपीची साईज 500 पेक्षा कमी असावी), पोलीस स्टेशनला केलेली तक्रार प्रत, मोबाईल खरेदी बिल, कोणतेही शासकिय ओळखपत्र.

6- त्यानंतर नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येइल.

7- भरलेली माहितीची खात्री करून Submit वर क्लिक करावे.

8- यावर आपल्याला तक्रार नोंदविल्याचा Request Number मिळेल.

9- हरवलेला मोबाईल Active/On झाल्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे मिळेल आणि संबंधीत पोलीस स्टेशनकडून संपर्क करण्यात आल्यावर पोलीस स्टेशन येथे भेट द्यावी.

10- तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी https://www.ceir.gov.in ला भेट द्या (Status) Request Number च्या मदतीने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here