*चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न कार्यकर्त्यांचा अपुर्व उत्साह*
चंद्रपूर : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन व सेलचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शहर कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकारी, प्रभाग व वार्ड अध्यक्ष व पदाधिका-यांच्या आढावा बैठकीचे आयोजन आज शनिवार दिनांक 28 मार्च 2026रोजी दुपारी 1.00 वाजता स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निरीक्षक ॲड. संजयजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित व जेष्ठ नेते ॲड. हिराचंदजी बोरकुटे यांचे अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली. प्रारंभी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने चंद्रपूर चे निरीक्षक संजय ठाकरे व गडचिरोलीचे निरीक्षक यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सहृदय सत्कार करण्यात आला. यानंतर शहर जिल्हा पक्षाध्यक्षा सौ.बेबीताई ऊईके यांनी प्रास्ताविक भाषणातुन पदभार सांभाळल्यानंतर अल्पावधीत पक्षाला बळकटी देण्यासाठी केलेल्या कार्याबद्दलची माहिती निरीक्षकांच्या समक्ष आपल्या जोरदार भाषणातून या आढावा बैठकीच्या निमित्ताने प्रखरपणे मांडली. तत्पूर्वी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष परब गिरटकर, कामगार आघाडी अध्यक्ष महेश काहीलकर, आदिवासी आघाडी जनार्दन गेडाम, युवक ग्रामीण कार्याध्यक्ष संजय ठाकुर, शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुधाकर कातकर आदि पदाधिका-यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर मुख्य मार्गदर्शन शहर जिल्हा निरीक्षक ॲड. संजय ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष मावळते आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या प्रदेश राष्ट्रवादीच्या आगामी बैठकी संदर्भात सुचना देत सर्व फ्रंटल व सेल च्या पदाधिकार्यांनी आपल्या कार्याची माहिती देण्यासाठी तयारीनीशी येण्याचे आव्हान केले. सोबतच चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा निरीक्षक म्हणून योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत आपल्या भाषणास पुर्णविराम दिला. यानंतर प्रदेश सरचिटणीस व गडचिरोलीचे निरीक्षक व आजच्या आढावा बैठकीचे अध्यक्ष ॲड.हिराचंदजी बोरकुटे यांनी कार्यकर्त्यांनी निष्ठेने पक्षकार्य करीत राहावे व पवार साहेबांचे पुरोगामी विचार घराघरात पोहचविण्यासाठी विषेश परीश्रम करण्याचे आव्हान आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.या आढावा बैठकीचे आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष दीपक कटकोजवार यांनी मानले व बैठकीचा समारोप केला. याप्रसंगी शहर युवक अध्यक्ष कलाकार मल्लारप, महिला अध्यक्षा नंदिनी गौरकार, अल्पसंख्याक अध्यक्ष बब्बू ईसा, ओबीसी अध्यक्ष विठ्ठल मस्की आदी प्रमुखांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.