Home Breaking News महामानवाला अभिवादन कोरपना येथे भीम जयंती निमित्त भव्य रॅली सुहेल अली मित्र...

महामानवाला अभिवादन कोरपना येथे भीम जयंती निमित्त भव्य रॅली सुहेल अली मित्र मंडळाकडून फळे व सरबत वाटप

52

महामानवाला अभिवादन कोरपना येथे भीम जयंती निमित्त भव्य रॅली सुहेल अली मित्र मंडळाकडून फळे व सरबत वाटप



नितेश केराम
कोरपना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरपना शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले बोद्ध विहार विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले तर सुहेल अली मित्र मंडळाने सामाजिक सलोख्याने दर्शन घडवत रॅलीतील सहभागिना अलपोहार आणि सरबत वाटप केले
रॅलीची सुरवात शहरातील मुख्य शिवाजी चॊक येथून करण्यात आली यावेळी सुहेल अली मित्र मंडळाच्या वतीने ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवदंना देण्यात आली रॅलीमध्ये बोद्ध समाजासह सर्व धर्मीय बांधव महिला पुरुष आणि युवक मोट्या संख्येने सहभागी झाले होते निळ्या ध्वजांनी आणि जय भीमच्या जय घोषाने सम्पूर्ण परिसर दुमदुम गेला होता भुसारी यांनी रॅलीचे स्वागत केले
सहभागी झालेल्या जनसमुदायासाठी सुहेल अली मित्र मंडळाच्या वतीने पिण्याचे पाणी ताजी फळे आणि थंडगार सरबत यांचे वाटप करण्यात आले उन्हाचा तडाखा लक्षात घेता या उपक्रमाचे सर्वानी कौतुक केले संविधानामुळे आज समाज थाठ मानेने उभा आहे आणि मानवता हाच खरा धर्म आहे हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला
या यशस्वी आयोजनासाठी सय्यद सुहेल अली नदीम सियद अबरार अली शहेबाज अली आदित्य मासिकर गौरव मेसराम शहेबाज बेग अल्लफ बेग साजिद शेख मजीद जब्बार भाई पवन बोरकर शमशुद्दीन शेख विजय जिवणे विजय भगत पुंडलिक टोंगे रोशन ढगडी प्रकाश कोहचाडे आरिफ शेख सोनू शेख मोबीन बेग सूरज येडे आदी कार्यक्त्यांनी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here