Home Breaking News माझ्या भावाचा शहर पोलिसांच्या दडपशाहीमुळे विष प्राशन करून आत्महत्त्या

माझ्या भावाचा शहर पोलिसांच्या दडपशाहीमुळे विष प्राशन करून आत्महत्त्या

114

माझ्या भावाचा शहर पोलिसांच्या दडपशाहीमुळे विष प्राशन करून आत्महत्त्या



मृतक दिलीप यादव यांचे बंधू अनुप यादव यांचा पोलिसांवर गंभीर आरोप.

चंद्रपूर :-

शहर पोलीस स्टेशनं येथे काल शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 ला पोलिसांनी गांजा विक्री प्रकरणी खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने व गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी पोलिसांनी पैशाची मागणी केल्याने दिलीप यादव यांनी काल दुपारी 2:30 च्या दरम्यान शहर पोलीस स्टेशनं येथे विष प्राशन करून आत्महत्त्या केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली, दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमात चुकीची माहिती देऊन माझ्या भावाच्या मृत्यूस जबाबदार आरोपी पोलीस कर्मचारी, अधिकारी कर्मचारी यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मृतक दिलीप यादव यांचे मोठे बंधू अनुप यादव यांनी केला आहे. या संदर्भात मृत्यूपूर्वी दिलीप यादव यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून पोलीस आपल्यावर खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप केला होता.

भिवापूर परिसरात पोलिसांनी
बुधवारी पांडुरंग बानलवार याला १०० ग्रॅम गांजासह अटक केली होती. दरम्यान गुन्हे दाखल झाल्यावर तपास सुरु होता मात्र एफआयआर मध्ये दिलीप यादव यांचे नाव नसताना केवळ पैशासाठी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी रुपेश पराते, भावना रामटेके, सोनवने व रामटेके साहेब हे दिलीप यादव यांना पैशाची मागणी करत होते मात्र आपण गुन्हा केलाच नाही तर पैशे कशाचे देऊ? हा प्रश्न उपस्थित करून दिलीप यादव यांनी पोलिसांच्या मागणीला भीक घातली नाही, मात्र पांडुरंग बानलवार या गांजा विकताना पकडलेल्या आरोपीला धमकी देऊन तू दिलीप यादव यांच्याकडून गांजा घेतल्याचे बोल असे सांगून दिलीप यादव ला शहर पोलीस स्टेशन येथे बोलावले व त्यांचेवर गुन्हे दाखल होतं होते त्यामुळे वारंवार खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या पोलिसांच्या छडयंत्रामुळे दिलीप यादव यांनी पोलीस स्टेशन मध्ये विष घेऊन आत्महत्त्या कारण्याचा प्रयत्न केला, दरम्यान विषाची बॉटल पोलीस स्टेशन मध्ये दिसली तर आपत येईल यामुळे पोलीस कर्मचारी रुपेश पराते यांनी त्याला बाहेर च्या गाडिच्डिक्कीत बॉटल टाकून दिलीप यांनी बाहेरूनच विष घेऊन आल्याचा बनाव केला असल्याचा आरोप अनुप यादव यांनी केला असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here