Home क्राईम मुल,सावली मार्गावर देशी व विदेशी दारू तश्करी करणा-यावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर...

मुल,सावली मार्गावर देशी व विदेशी दारू तश्करी करणा-यावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिसची मोठी कारवाई 

109

मुल,सावली मार्गावर देशी व विदेशी दारू तश्करी करणा-यावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिसची मोठी कारवाई

चंद्रपुर
पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन चंद्रपुर यांचे आदेशानुसार चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध चंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांना दिले त्याअनुषंगाने पो. नि. महेश कोडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यावरून दिनांक ०५/०५/२०२४ सपोनि हर्षल ऐकरे व पोलीस स्टॉफ असे पोलीस स्टेशन, सावली परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमिदाराकडुन माहिती मिळाली की, नामे विक्की सुरेश गोडसेलवार(२७) धंदा-आर.ओ.प्लॅन्ट,रा.मोखाळा,ता. सावली जि,चंद्रपुर त्याचे घरा समोर हुडाई आय-२० कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. एफ. ३७७१ मध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारू वाहतुकी करीता साठवुन ठेवल्याच्या खबरे वरून नमुद प्रमाने मिळाली असता सदर वाहनाची पंचा समक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये १५०० नग देशी दारू,२४ नग रॉयल स्टॅग कंपनीची प्रत्येकी २,००० एम. एल. मापाने भरलेली विदेशी दारू, १०० नग रॉयल स्टैंग कंपनीची प्रत्येकी ९० एम.एल. मापाने भरलेली विदेशी, २४ नग रॉयल कंपनीची प्रत्येकी ३७५ एम. एल. मापाने भरलेली विदेशी दारू, २४ नग आयकॉनीक वाईट कंपनीची विदेशी दारू प्रत्येकी १८० एम. एल. मापाने भरलेली तसेच ४८ नग हॅवर्ड ५००० कंपनीची बियन प्रत्येकी ५०० एम.एल. मापाने भरलेली असा एकुण १,२५,३६०/- रूपयाचा माल तसेच गुन्हयात वापरलेली हुडाई आय-२० कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. एफ. ३७७१ किमंत ८,००,०००/- रूपये असा एकुण ९,२५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरचा माल हा नरसिंग उर्फ नरसिंग अन्ना गनवेनवार, रा. मुल, जि. चंद्रपुर याचा असल्याचे सांगितले. नमुद आरोपीस पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन, सावली यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ऐकरे, पोहवा जयंता चुनारकर, पोहवा रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा सतिश अवथरे, चेतन गज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here