
कार्यकर्त्यानी आमदाराला फिरवला फोन एक्स रे मशीन उपलब्ध
- नितेश केराम
कोरपना तालुक्यातील प्रमुख व अत्यावश्यक आरोग्य सुविधा असलेल्या ग्रामीण रुग्णालय एक्स रे मशीन गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त असल्याने रुग्णांना मोट्या अडचणीचा सामना करावा लागत होता हाडांचे फँक्चर छाती व फुफफुसांच्या आजारांचे निदान अपघातग्रस्ताचे तात्काळ तपासणी आदींसाठी एक्स रे तपासणी ही अत्यँत महत्वाची असते
मात्र मशीन नादुरुस्त असल्याने रुग्णांना तपासणीसाठी गडचांदूर राजुरा चंद्रपूर येतील सरकारी व खासगी रुग्णालयांचा मार्ग धरावा लागत होता यामुळे वेळ पैसा आणि शारीरिक कष्ट या तिन्हीचा त्रास रुग्णांना होत होता
कोरपना ग्रामीण रुग्णालय हें तालुका पातळीवरील महत्वाचे सरकारी आरोग्य केंद्र आहे येते केवळ कोरपना शहरातीलच नव्हे तर परिसरातील शेकडो गावांमधी ल रुग्ण येतात अपघातात हात तुटणे क्षयरोग निमोनिया कर्करोगाच्या प्राथमिक तपासण्या अशा अनेक बाबतीत एक्स रे सुविधा उपचारासाठी जिवनदायी ठरते
दरम्यान भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष व ओम पवार यांनी ही समस्या राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्याशी दूरध्वनीद्रारे चर्चा करून लक्ष वेधले यावर आमदारांनी आरोग्य यंत्रेनेशी सम्पर्क साधून तातडीने पावले उचलत नवीन एक्स रे मशीन रुग्ण सेवेत उपलब्ध करून दिली आहे अल्पावधीतच नवीन मशीन बसविण्यात आले असून आता रुग्णांना पुर्ववत तपासणी सुविधा मिळणार आहे
यामुळे अपघातग्रस्त व गँभीर रुग्णांच्या उपचारात होणारा विलंब तळणार असून आर्थिकदुस्त्या दुर्बल रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा खर्च वाचणार आहे यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आमदार भोंगळे यांच्या कार्य त त्परतेचे कौतुक केले आहे










